Maharashtra Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या गेलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागणार याकडे संपूर्ण राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे. यंदाही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या भविष्यासाठी या निकालाचे फार महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात बारावीचा आणि जून महिन्यात दहावीचा निकाल लागेल अशी शक्यता आहे. Maharashtra Board Result 2025
यावर्षी 2025 मध्ये बारावीचा निकाल 15 मे च्या आत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, ही माहिती थेट महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितले की सध्या उत्तर पत्रिकांचे मूल्य आपण अंतिम टप्प्यात असून वेळेत निकर जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अधिकृत तारीख अद्याप बोर्डाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही. मागील वर्षी 2024 मध्ये बारावीचा निकाल 21 मे रोजी आणि दहावीचा निकाल 27 मे रोजी लागला होता. हाच कालावधी डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी तयारी करत आहेत. या निकालानंतर पुढील शिक्षणाच्या योजना आखणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अत्यंत निर्णायक असते.
निकाल कुठे पाहता येणार ?
ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट्सवर भेट द्यावी लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला रोल नंबर आणि आई चे नाव हे तपशील भरावे लागतील. वेबसाईटवर गेल्यानंतर “SSC RESULT 2025 किंवा HSC RESULT 2025” या लिंक वर क्लिक करून आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल स्क्रीनवर दिसल्यानंतर तो पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करता येईल आणि त्याची प्रिंट आऊट सुद्धा काढून येता येईल.
निकालात विद्यार्थ्यांना गुणांसोबत ग्रेड ही दिला जातो. ग्रीटिंग पद्धतीनुसार 75% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास डेडिकेशन, सट्टा किंग पेक्षा जास्त गुण मिळाल्यास फर्स्ट क्लास, 45 ते 59 टक्के दरम्यान असल्यास सेकंड क्लास आणि 35% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास थर्ड क्लास असा निकाल जाहीर होतो. पस्तीस टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सप्लीमेंट्री परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले रोल नंबर आणि तपशील वेळेत तयार ठेवावेत आणि निकाल जाहीर होताच त्वरित वेबसाईटवर जाऊन निकाल पाहावा.
राज्यातील ग्रामीण भागात सुद्धा इंटरनेट उपलब्ध असल्याने गावातील विद्यार्थी सुद्धा अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहू शकतात. काही ठिकाणी शाळामार्फत सुद्धा निकालांची प्रिंट विद्यार्थ्यांना पुरवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा आणि बोर्डाच्या अधिकृत घोषणाकडे लक्षपूर्वक पहावे. काही खोट्या अफवा किंवा गैरसमज पसरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट नुसार दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितींचा आधार घ्यावा.
हे पण वाचा : HSC Result 2025 : बारावीचा निकाल या तारखेला लागणार? आली तारीख आणि वेळ समोर