Maharashtra Alert : सध्या महाराष्ट्रात हवामानाने एकदम वळण घेतला आहे. काही भागांमध्ये उन्हाची जळ जबरदस्त जाणवत आहे तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे दहशत निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट जाणवणार आहे. मुंबई से कोकणामध्ये मात्र हवामान कोरडा राहणार असून सध्या कोणत्याही पावसाची किंवा हिटवेवचा अंदाज देण्यात आलेला नाही. Maharashtra Alert
हवामान अपडेट साठी इथे क्लिक करा.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल आणि एक मे साठी विशेष इशारे दिलेले आहेत. पुढील चार दिवसात राज्यात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या हवामान बदलाचा अनुभव नागरिकांना पाहायला मिळणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण पेरणीपूर्वी मशागत सुरू झालेली आहे आणि अवकाळी पाऊस किंवा वादळ आलं तर नुकसान टाळता येईल त्यासाठी सज्ज राहणं गरजेचं आहे.
विदर्भात पावसाचा संकट!
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील, भंडारा, बुलढाणा, अमरावती,अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता असून सायंकाळी वादळ व पावसाची तीव्रता अधिक जाणवू शकते.
या भागामध्ये जमिनीवरील उष्णता वाढल्यामुळे आणि वरच्या स्तरावर चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. विजा आणि पावसाचा इशिरा दिल्याने नागरिकांनी उघड्यावर फिरणे टाळावे आणि आकाशात ढग जमात होऊ लागले की तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
हे पण वाचा | सावधान! राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; IMD नवीन अलर्ट पहा
मराठवाड्यात उष्णतेचे लाट
भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमानात मोठे वाढवणार असल्याची शक्यता दिली आहे याच पार्श्वभूमी वरती उष्णतेची लाट दिलेली आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस हीटवेव चा इशारा जारी करण्यात आलेला आहे. या भागात दुपारच्या वेळेस तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, कुणाची झळ अति तीव्र असणार आहे.
ही उष्णता किंवा त्रासदायक नाही, तर आरोग्यास घातक ही करू शकते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेषता: वयोवृद्ध, लहान मुले आणि हृदयरोगी व्यक्तींनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. पाणी अधिक प्यावे, डोक्यावर टॉयलेट किंवा टोपी असावी. अंग झाकलेले राहू आणि शक्यतो सावलीतच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिलेला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई हवामान कोरड
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आश्वासच्या उपनगरात आजचा दिवस कोरडा राहणार आहे. आकाश निरभ्र राहील आणि उन्हाचा चटका मात्र जाणवेल, कोकणात ही सध्या कोणत्याही प्रकारचा पावसाचा किंवा उष्णतेच्या लाटेचा इशारा नाही.
मात्र वाऱ्यामुळे थोडासा गारवा जाणवण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील भागात सकाळ-संध्याकाळ समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल.
सध्या राजस्थान दक्षिण पश्चिम भागात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच विदर्भ ते उत्तर केळ दरम्यान उत्तर दक्षिण ट्रफ लाईन सक्रिय आहे. यामुळे हवामानात गोंधळ आणि अस्थिरता निर्माण झालेली आहे.
या ट्रफ मुळे वाऱ्यांची दिशा सतत बदलते, जे हवामानात अचानक उलथापाल आत घडून आणते. दुसरीकडे बांगलादेशच्या ईशान्य भागातील चक्र कारवार यांचा शेत्र सक्रिय असून त्याचा प्रभाव ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय या भागांवरती जाणवत आहे.
मागील 24 तासाचा हवामानाचे चित्र
गेल्या 24 तासांमध्ये देशात विविध भागांमध्ये विविध हवामान घडामोडी घडल्या. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल या उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फ वृष्टी सह जोरदार वादळ आणि पाऊस झाला.
पूर्व मध्य प्रदेश, सिक्कीम मध्ये गारपीट झाली. तर सब हिमालियन पश्चिम बंगाल, उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये मुसळधार पाऊस पडला. पूर्व उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यांचे नोंद झाली. या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे हवामानाचा पूर्णपणे अस्थिर्त झालेला ट्रेड, जो हवामान खात्याच्या निरीक्षणात आहे.
यात पार्श्वभूमी वरती अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे यामुळे शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे.
तर शेतकरी ने सध्या पेरणीपूर्वी मशागत करताना अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेऊन आंबा, फळबागा, भाजीपाला, तूर सोयाबीनच्या पूर्व नियोजनात बदल करावा. विजांचा पाऊस असल्यास शेती अवजारे उघड्यावर ठेवू नयेत, विजय पासून सुरक्षित अंतर ठेवावे.
एप्रिल संपला संपला आता वातावरण डोकं वर काढला आहे. काही भागामध्ये उष्णतेने भाजून काढले तर काही ठिकाणी पाऊस आणि विजांची भीती वाटते. अशावेळी नागरिकांनी हवामान खात्याच्या अपडेट सतत पाहत राहणे आवश्यक. शेतकरी आणि विशेष काळजी घेणे आवश्यक आहे तर पुढच्या हवामान अपडेट साठी आमच्या पोर्टलला भेट देत राहा
माहितीस्त्रोत : प्रसारमाध्यम, हवामान अंदाज
लेखक : सौरभ गायकवाड