mahahsscboard.in result : दहावी आणि बारावी निकालाची तारीख जाहीर! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! वाचा सविस्तर

mahahsscboard.in result : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे लक्ष सध्या एकाच गोष्टीकडे लागून राहिले आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात MSBSHSE तर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) व बारावी (HSC) परीक्षेचा निकाल. यंदा वर्षी एकूण मिळून 21 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिलेले आहेत आता सर्वांचे लक्ष निकालाच्या तारखेकडे लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा प्रसार माध्यमांमधून व मीडियाच्या माध्यमातून प्रसार होत आहेत. आता मंडळाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीलाच घोषणा होण्याची शक्यता आहे. mahahsscboard.in result

यावर्षी बारावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान झाली होती, तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्चपर्यंत पार पडली आहे. बारावीला जवळपास 15 लाख विद्यार्थी बसले होते, तर दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. परीक्षेचे केंद्र हे राज्यभरात 3000 पेक्षा अधिक ठिकाणी होते. गेल्या वर्षाप्रमाणेच याही वर्षी परीक्षा सुरळीतपणे पूर्ण झाल्या आहेत, आणि यांना बोर्डाने अगदी नियोजनपूर्वक वेळेत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो.

मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उत्तर पत्रिका तपासणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जवळपास सर्व जिल्ह्यांमधून तपासणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पंधरा मे पर्यंत दोन्ही निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा निकाल लवकर लागत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी जास्त वेळ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी खूप घाई करावी लागत होती. याचा त्रास खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक जाणवत होता कारण त्यांना कुठे पुढे ऍडमिशन घ्यायचा आहे याचा विचार करायला वेळ पुरत नव्हता. पण आता बोर्डाने वेळेस निर्णय घेत, परीक्षा लवकर घेतल्या आणि लवकरात लवकर निकाल लावणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निकाल कसा आहे कुठे पाहायचा, हे सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण निकाल लागला की लाख विद्यार्थी एकाच वेळी वेबसाईटवर धाव घेतात, त्यामुळे अनेकदा सर्वर डाऊन होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक वेबसाईट लक्षात ठेवाव्यात आणि रिझल्ट पाहताना संयम ठेवावा. त्यामुळे तुम्हाला आम्ही काही वेबसाईटचे खाली नावे दिलेले आहे तिथे तुम्ही बिंदास निकाल पाहू शकता.

या वेबसाईट वरती दहावी आणि बारावीचा निकाल पहा

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

निकाल पाहताना विद्यार्थ्यांनी आपले रोल नंबर आणि आईचे नाव (mother Name) बरोबर भरावे लागणार आहे. काही वेळा वेबसाईटवर तुमचं सीट नंबर मागितलं जात, तर काही वेळा जन्मतारीख देखील विचारली जाऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याच्या आधी ही माहिती तयार ठेवावी, म्हणजे वेळेवर गोंधळ होणार नाही.

दहावी- बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याचा अंतिम टप्पा असतो. खास करून बारावीचा निकाल हा उच्च शिक्षणासाठी लागतो, मग तो इंजिनिअरिंग असो, मेडिकल, कॉमर्स, आर्ट्स किंवा कोणतेही प्रोफेशनल कोर्स. त्यामुळे हा निकाल म्हणजे एक केवळ कागदाचा तुकडा नाही, तर त्या मागील प्रत्येक रात्रीच्या जागरणाचा, अभ्यासाचा आणि मेहनतीचा निकाल असतो. तसंच दहावीचा निकाल सुद्धा विद्यार्थ्यांना पुढच्या शाखेसाठी निवड करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरतो.

बराच वेळ निकालानंतर काही विद्यार्थ्यांचे अपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे आत्मविश्वत डळमळतो. पण एक लक्षात ठेवा जीवनात फक्त एक परीक्षा किंवा एक निकाल यावरती काही ठरत नाही. ज्यांनी चांगला अभ्यास केला आहे, त्यांनी रात्रीचे यश मिळवले असेलच. पण ज्यांचे मार्क्स अपेक्षाप्रमाणे आली नाही, तर त्यांनी निराश होऊ नये. आयुष्यात अजून अनेक संधी आहेत, फक्त त्या ओळखायला आल्या पाहिजे.

मंडळाकडून सांगण्यात आला आहे की निकाल नंतर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणाबाबत शंका असल्यास पुनर् तपासणी (Rechecking) व छायाप्रती (Photocopy) साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्याची तारीख निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच कळवण्यात येणार आहे. तसेच जर कोणालाही पुरवणी परीक्षा दहावी लागली, तर त्यांच्यासाठी बोर्ड लवकरच वेळापत्रक जाहीर करेल.

निकालाच्या दिवशी अनेक वृत्तवाहिन्या, शैक्षणिक वेबसाईट आणि न्यूज पोर्टलवर ही थेट लिंक देण्यात येतात. मात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवरच निकाल पाहावा, कारण निकल वेबसाईटवर क्लिक करून माहिती चोरी होण्याची शक्यता असते.

पालकांनी सुद्धा या काळात आपल्या मुलांना भावनिक आधार द्यावा, त्यांच्यावरती अति दबाव टाकू नये. गुण काही जास्त थोडे झाले तरी ते अजून त्याच प्रेमाचे, कौतुकाचे पत्र आहेत. शिक्षण हे एक प्रवास आहे, फक्त एका निकालावरती संपूर्ण मूल्यांकन होऊ शकत नाही.

शेवटी एवढेच सांगायचंय बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो दहावीचा निकालनेच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो अधिकृत वेबसाईटवर लिंक उपलब्ध असणार आहेत पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळणार आहे निकाल पाहताना संयम आणि सावधगिरी बाळगा अपेक्षा पेक्षा कमी गुण मिळाले तर खचू नका पुढे अजून संधी आहेत.

हे पण वाचा | HSC SSC Result Dates : इयत्ता दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर? वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!