mahahsscboard.in : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण(MSBSHES) मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. यावर्षी दहावी बारावीच्या एकूण 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, आता त्यांचे निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा संपत आलेली आहे. लवकरच निकाल जाहीर होणार. mahahsscboard.in
प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल आणि मे च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत तारखा लवकरच घोषित केल्य जातील, मात्र सध्या मिळालेल्या माहितीनुसार 15 मे 2025 पर्यंत हा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी सरकारच्या या घोषणाकडे लक्ष ठेवावे.
यंदा परीक्षा कधी पार पडल्या?
बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान पार पडल्या. यावर्षी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रावर या परीक्षा झालेल्या आहेत. तर दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाले आहेत. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून यंदा बोर्डाने परीक्षा लवकर घेतल्या आणि निकाल मे अखेरच्या आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
यंदा निकाल लवकर जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे त्यांना पुढच्या ऍडमिशन साठी कॉलेज व कोर्स निवडण्यास मदत होणार आहे. विशेषतः उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी किंवा इतर शैक्षणिक योजना साधण्यासाठी लवकर निकाल लाभदायक ठरणार आहे.
या ठिकाणी पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
sscresult.mkcl.org
निकाल पाहण्यासाठी साठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख (DOB) आवश्यक असणार आहे. याशिवाय काही वेळाने कालची लिंक अतिरिक्त पोर्टलवर सक्रिय केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचना नियमितपणे तपासणी महत्त्वाचं आहे.
दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांसाठी सध्या निकालाची उत्कंठा वाढली आहे. लवकरच, मे महिन्यामध्ये पहिलं किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले रोल नंबर तयार ठेवून निकाल जाहीर होईल याची वाट पहावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आमच्या पोर्टलच्या माध्यमातून शुभेच्छा.
हे पण वाचा : mahahsscboard.in result : दहावी आणि बारावी निकालाची तारीख जाहीर! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! वाचा सविस्तर