LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर होत असतात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर झाले आहेत आणि यामध्ये मोठा बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 33.50 रुपयाची घसरण केली आहे. जर तुम्ही व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर धारक असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. यामुळे आता हॉटेल, केटरिंग आणि रेस्टॉरंट चालकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल नाही
या महिन्याच्या सुरुवातीला व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. घरगुती वापरला जाणारा 14.2 किलोचा गॅस सिलेंडर मागील महिन्याच्या किमतीमध्येच उपलब्ध आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना कोणताही दिलासा मिळाला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ही सलग पाचव्यांदा घसरण झाली आहे.
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मोठा धक्का! योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई -आदिती तटकरे
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले जातात. यामध्ये 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीमध्ये आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1665 रुपयावरून कमी होऊन 1631.50 झाली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायकांना मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांचा खर्च काही प्रमाणामध्ये कमी होत आहे. LPG Gas Cylinder Price
मागील काही महिन्यापासून 14.2 किलोच्या घरगुती कोणताही बदल झाला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती मागील पाच महिन्यापासून घसरत आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत जुलै महिन्यामध्ये 58.50 रुपयाची घट झाली होती. त्याआधी जूनमध्ये 24 रुपयाची तर मे महिन्यामध्ये 14.50 रुपयाची आणि एप्रिल महिन्यामध्ये 41 रुपयाची मोठी घट झाली होती. या सलग घसरणीमुळे व्यवसाय क्षेत्रात मोठा आर्थिक आधार मिळत आहे.
थोडक्यात, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली घसरण आनंदाचीच आहे. यामुळे हॉटेलमधील वस्तूंच्या किमती स्थिर राहतील आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार नाही. जरी घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला नसला तरी मग पुढील महिन्यात त्यामध्ये घसरण होण्याची अपेक्षा आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..”