LPG gas cylinder price : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण? शहरानुसार नवीन दर जाणून घ्या

LPG gas cylinder price: मे 2025 महिन्याची सुरुवात सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासा ठरली आहे. ती म्हणजे सलग दुसऱ्या महिन्यात व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे. एक मे 2025 रोजी इंडियन ऑइल कंपनीने केलेला नवीन दर अपडेट नुसार, 19 किलो वजनाचा व्यवसाय गॅस सेंटरच्या दरात 14.5 रुपयांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, हि दर कपात देशभरात लागू करण्यात आली असून मोठ्या शहरांमध्ये थेट परिणाम जाणवू लागला आहे. LPG gas cylinder price

घरगुती गॅस दर मात्र स्थिर

सध्या घरगुती वापरांसाठी असलेला 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेला काही महिन्यांपासून या दरात स्थिरता कायम आहे. परिणामी, घरगुती गॅसच्या वापर करताना कोणताही दिलासा मिळालेला नाही, मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोट्या व्यवसायिकांसाठी व्यवसाय सिलेंडर दर कपात मोठा दिलासा मानला जात आहे

शहरानुसार किती दर घसरले?

एक मे 2025 पासून पुढील सुधारित दर देशातील प्रमुख शहरांमध्ये लागू करण्यात आलेले आहेत.

  • दिल्ली – ₹1,747.50
  • कोलकत्ता – ₹1851.50
  • मुंबई – ₹1,699
  • चेन्नई -₹1,906.50

या दर कपातीमुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर गेल्या दोन महिन्यात एकूण ₹55.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मार्च 2025 मध्ये दिल्लीमध्ये याची किंमत ₹1803 होती, जी आता घटून ₹1747.50 इतकी झाली आहे.

दर कपाती मागचं कारण काय

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय एलपीजी दरावरही दिसून येत आहे. सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यवसायिक एलपीजी दरांचे पुनरावलोकन केले जाते. मागणी पुरवठा, आंतरराष्ट्रीय किमती आणि स्थानिक कर रचनेनुसार हे दर निश्चित केले जातात.

घरगुती गॅस सिलेंडरवर दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य घरगुती वापरकर्त्यांची अपेक्षा आहे की पुढील काही महिन्यात घरगुती एलपीजी सिलेंडरवर सरकार दर कपात करेल.

हे पण वाचा | आनंदाची बातमी! या नागरिकांना मिळणार ₹300 रुपये मध्ये गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!