Lose weight naturally | जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा विचार करत असाल? तुम्हाला वाटत आहे की आता थोडा लठ्ठपणा वाढतोय, कपडे टाईट होऊ लागले आहेत, पण वेळ मिळत नाही आणि काही जिम लावून पाहिली उपास करून पाहिला परंतु वजन काय कमी होत नाही तरी बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला काही तुमच्या सवयी बदलणे गरजेचे आहे ही बातमी नक्की तुमच्या कामाचे ठरणार आहे. उपास न करता, नो डाइट, जिम न जाता, फक्त काही सवयी बदलल्या, की वजन नैसर्गिकपणे कमी होऊ शकत! हे केवळ तज्ञांचे म्हणणं नाही, तर हजारो लोकांनी अनुभवलेला बदल आहे. Lose weight naturally
आहार व वजन व्यवस्थापन क्षेत्रातील काही तज्ञ सांगतात वजन कमी करण्यासाठी सात सोप्या पण प्रभावी सवयी सांगितले आहेत. या सवयी तुम्ही दररोजच्या आयुष्यात थोडा विचारपूर्वक बदल करून अमलात आणाल तर, कुठलाही खर्च न करता, शरीर न थकवता, तुमचं वजन नैसर्गिक रित्या कमी होऊ शकतात. बघूया काय आहे त्या सवयी.
कमी नाही, भरपूर खा- पण अन्न योग्य असावा
दोन घास खाल्ले की थांबा! असं नेहमी म्हणणं योग्य नाही. कारण तुम्ही योग्य प्रकारचा अन्न खाल्लं, तर ते कितीही खाल्लं, तरी ते तुमचं वजन वाढवू शकत नाही. उलट पोटभर जेवल्यास वारंवार काहीतरी खाण्याची सवय सुटते. स्लॅड, भाज्या, फळ, शेंगदाणे, डाळी, जोरी बाजरी सारखी धान्य ही पचनास मदत करणारे फायबरिक्त अन्न तुम्हाला अधिक काळ तृप्त ठेवेल.
शरीर बळकट करा
आपण केवळ वजन घटवण्याकडे बघतो, पण शरीर बळकट करणही तेवढेच गरजेच आहे. यासाठी अंडी, दूध, पनीर, मसूर, हरभरा, पातळ मांस अशा प्रथिनांनी भरलेल्या गोष्टी खा. प्रोटीन मुळे फक्त स्नायूच काम सधारत नाही, तर भूक पण नियंत्रणात राहते.
पाणी प्या आणि पचन सुधारा
तुम्ही भूक लागल्यावर खूप वेळा खरंतर तहानलेले असतात! पाण्याची कमतरता ही वजन वाढीचे कारण बनते. रोज आठ-दहा ग्लास पाणी प्या. जेवणापूर्वी पाणी पिल्याने भूक कमी लागते.
चालत राहा घरात का असेना!
जिम नसेल, ठीक आहे! पण चालायचं सोडू नका. बाजारात जाताना, फोनवर बोलताना, घरात स्वच्छता करताना किमान 30 मिनिटे चालण्याचा नियम पाळा. स्टिचिंग, भांडी घासण, अंगण झाडणं या सर्व गोष्टीतूनही कॅलरीज बर्न होतात.
झोप आणि तान यांचं नातं समजा
झोप कमी झाली, की वजन वाढतं! हे अनेक लोक मान्य करत नाहीत. पण कमी झोप झाल्यामुळे ग्रीलिंग आणि लेफ्टीन हे भूक नियंत्रण करणारे हार्मोन्स असंतुलित होतात. यामुळे गोड खाण्याची क्रिविंग वाढते. याशिवाय ताण-तणावामुळे क्रॉटिसोल वाढतो आणि तोही पोटा भोवती चरबी जमा करतो.
मनापासून खा, समाधानाने थांबा
आपण TV बघता बघता खातो. मोबाईल स्क्रोल करताना स्नॅक्स खातो. यामुळे काय खाल्लं, किती खाल्लं याचं भान राहत नाही. म्हणून जेवताना शांतपेन, मनापासून खा. पोट भरलं की लगेच थांबा. भावनिक खान टाळा. कंटाळा, तणाव, राग यावर फक्त खाण्याने उपाय होत नाही.
वजन कमी करणे ही एका दिवसाची गोष्ट नाही. पण तुमच्या सवयी जर बदलल्या, तर नैसर्गिक रित्या वजन कमी होऊन शरीर फिट, चेहरा तेजस्वी, आणि मन शांत होतं. या सवयीन मध्ये कुठेही डाईट प्लॅन नाही, जिम चार्ज नाही… आहे फक्त तुमचं निश्चय आणि शहाणपणाची निवड.