LIC Vima Sakhi Yojana: घरातील जबाबदाऱ्या सांभाळूनही काहीतरी करण्याची इच्छा ठेवणाऱ्या महिलांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरत आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून घर खर्चाला हातभार लावण्याचे ध्येय अनेक जनी पाहत असतात. पण बाहेर जाऊन नोकरी करणं प्रत्येकांना शक्य होत नाही. अशाच महिलांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एलआयसी ची विमा सखी योजना एक मोठा आधार बनत आहे. ही योजना विशेष ग्रामीण भागातील महिलांसाठी बनवली गेली आहे. ज्यांच्यासाठी आता आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे खूप सोपे झाले आहे.
विमा सखी योजना काय आहे?
विमा सखी योजना ग्रामीण भागातील महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्यासाठी संधी देते. या योजनेची विशेषता अशी आहे की तुम्हाला यासाठी घराबाहेर पडावे लागणार नाही. अगदी कमी शिक्षण आणि कमी कौशल्यातही महिला यात सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले जाते. या योजनेची पात्रता काय आहे व या योजनेला अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पात्रता काय आहे?
- अर्ज करणाऱ्या महिलांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असावे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांचे पती मुलं किंवा घरातील इतर कोणीही आधीपासून एलआयसी मध्ये कार्य करत असेल त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
- याशिवाय या पूर्वीचे एलआयसी एजंट किंवा निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकत नाहीत.
हे पण वाचा| FD, SIP विसरा! पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा 2.46 लाख रुपये
विमा सखी योजनेचे फायदे
या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना फक्त कमिशनवर अवलंबून राहावे लागणार नाही. तर सरकारकडून त्यांना निश्चित पगार सुद्धा दिला जात आहे. पहिल्या वर्षी 7000 रुपये प्रति महिना, दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये प्रति महिना, तिसऱ्या वर्षी 5000 रुपये प्रति महिना याचा अर्थ असा होतो तीन वर्षात तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी विकल्यास मिळणारे कमिशन आणि बोनस हा अतिरिक्त फायदा आहे. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितका जास्त फायदा मिळेल.
विमा सखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना केवळ विमा विकण्याचं प्रशिक्षण दिल जात नाही तर त्यांच्यात संवाद कौशल्या, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण तयार केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. पदवीधर महिला तर विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकतात. याचा अर्थ ही योजना फक्त उत्पन्न मिळवून देणारी नसून तर एक उत्तम करिअर घडवणारी योजना आहे. LIC Vima Sakhi Yojana
या योजनेला अर्ज कसा करावा?
- सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्या ठिकाणी विमा सखी असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
- अर्ज भरताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड वयाचा आणि पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- ही सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड केलेली असावीत.