LIC ची भन्नाट योजना! महिलांना मिळणार दर महिन्याला इतके रुपये, वाचा सविस्तर माहिती

LIC Mahila Yojana | भारत सरकार अंतर्गत व राज्य सरकार अंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी अनेक भन्नाट योजना राबवल्या जात आहेत. कधी लाडकी बहीण योजना तर कधी एलआयसी विमा सखी योजना ही योजना महिलांसाठी एक आर्थिक मदतीची संधी निर्माण करून देणार आहे. त्यासोबत महिलांना स्वतःचा रोजगारही उपलब्ध होणार आहे. विशेषतः ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मोठा आर्थिक स्रोत बनणार आहे. कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता जाणून घेऊया सविस्तर माहिती. LIC Mahila Yojana

LIC विमा सखी योजना म्हणजे काय?

एलआयसी विमा सखी योजना ही योजना महिलांसाठी एक मोठी संधी आहे. ज्यामुळे महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यास व आर्थिक मदत होणार आहे. आणि महिलांसाठी एक रोजगाराची संधी देखील निर्माण करणार आहे. त्यांना विमा विक्री द्वारे कमिशन मिळते आणि त्याबरोबर सरकारकडून आर्थिक मदत देखील दिली जाते. महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहे. ज्यामुळे त्यांना एक मोठी मदत होणार आहे.

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे सशक्तिकरण व त्यांना स्वावलंबी बनवणे व जागृती वाढवणे आणि महिलांना व्यवसाय संधी उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सरकार या योजनेअंतर्गत पहिल्य वर्षात एक लाख महिला तर पुढील दोन वर्षात दोन लाख महिलांना जोडणार आहे. या योजनेतून तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता त्यासाठी खालील प्रकारे लेख वाचा.

विमा सखी योजनेत कसा करायला अर्ज?

एलआयसीच्या या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तिथे गेल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा. निवड झाल्यानंतर महिलांना विमा विक्री संबंधित प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना अधिकृत विमा एजंट म्हणून मान्यता दिली जाणार आणि त्यांना आपल्या भागात विमा विक्री करायला सांगणार जेणेकरून महिलांना एक रोजगार निर्माण होणार आहे.

विमा सखी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील ( Xerox)
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

18 ते 50 वर्ष दहावी पास किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेला महिलांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अर्जदार महिला भारताची नागरिक असणे आवश्यक.

या योजनेअंतर्गत केवळ आर्थिक लाभ मिळणार नाही तर महिलांना एक रोजगार निर्मिती करून देणार आहे. विशेषता ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मोठी संधी आहे. ज्यामुळे महिलांना स्वतःची अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

हे पण वाचा | पिक विमा म्हणजे काय? पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पहा पूर्ण माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!