LIC च्या भन्नाट योजनेत दरमहा 794 रुपयाची गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 25 हजार रुपये

LIC Jivan Labh Yojana: तुम्ही देखील गुंतवणुकीसाठी चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे अशा अनेक चांगल्या योजना आहेत. त्या योजनेपैकी आपण सुप्रसिद्ध एलआयसी जीवन लाभ योजना बद्दल जाणून घेणार आहोत. एलआयसीच्या या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या योजनेची पात्रता या योजनेचे उद्देश या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

LIC च्या गुंतवणूक योजनेत तुम्हाला खालील फायदे मिळतात:

  • कोणत्याही योजनेत पैसे गुंतवायचे म्हटल्यानंतर त्यात सर्वात महत्त्वाचे अस्थी सुरक्षितता एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात सुरक्षित कंपनी आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवलेले तुमची रक्कम एकदम सुरक्षित असते.
  • त्याचबरोबर गुंतवणूक केलेल्या रकमेत वाढ किती होते हे देखील तितकेच आवश्यक आहे. एलआयसीच्या गुंतवणूक योजनेत चांगला परतावा मिळतो ज्यामुळे तुमची संपत्ती वाढते.
  • एलआयसी मध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला निवडता येतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता.
  • एलआयसीच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कर लाभ मिळतो त्याचबरोबर एलआयसीच्या सर्व योजना अतिशय लोकप्रिय आहेत.

LIC ची जीवन लाभ योजना काय आहे?

LIC जीवन लाभ योजना ही एक अतिशय लोकप्रिय बचत आणि सुरक्षित योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. त्याबद्दल जाणून घेऊया:

योजनेचे फायदे:

  • या योजनेत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते.
  • एलआयसी पॉलिसी ची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि परताव यासोबत बोनस देखील दिला जातो.
  • या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी चांगली बचत करू शकतात.
  • या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयकर कायद्याअंतर्गत कर लाभ दिला जातो.
  • तुम्ही एलआयसीच्या या पॉलिसी अंतर्गत कर्ज देखील घेऊ शकतात. अचानक तुम्हाला पैशाची गरज भासल्यानंतर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतात.

LIC ची ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वयोमर्यादा आठ वर्षे असावे, ज्यांचे वय आठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना या पॉलिसीत गुंतवणूक करता येते. ही पॉलिसी तीन पद्धतीने घेता येते, यामध्ये 16 21 आणि 25 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता. ही पॉलिसी तुम्ही कमीत कमी दोन लाख रुपयांसाठी घेऊ शकता. त्यानंतर यात जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही, यात तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. LIC Jivan Labh Yojana

पाच लाख 25 हजार रुपये कसे मिळवावे?

जर तुम्ही या योजनेत दोन लाख सम अश्युअर्डसाठी सोळा वर्षासाठी प्रीमियम भरला तर तुम्हाला दर महिन्याला 994 रुपये भरावे लागतील. सम अश्युअर्डच्या रूपात दोन लाख रुपये, वेस्टेड सिम्पल रीव्हिजनरी बोनस अंतर्गत 2 लाख 35 हजार रुपये आणि फायनल ऑडिशनला बोनस 90 हजार रुपये मिळेल. यानुसार एकूण मॅच्युरिटी वर पाच लाख 25 हजार रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेत 25 वर्षाच्या मॅच्युरिटीवर एकूण 1.50 लाख जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटी नंतर पाच लाख 25 हजार रुपयाची रक्कम मिळेल.

जीवन लाभ योजनेत गुंतवणूक कशी करावी?

  • या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू शकतात.
  • त्याचबरोबर या योजनेत तुम्ही नियमित अंतरावर ठराविक प्रीमियम भरून गुंतवणूक देखील करू शकतात.
  • तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पॉलिसीची मुदत निवडू शकतात.

LIC च्या जीवन लाभ योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “LIC च्या भन्नाट योजनेत दरमहा 794 रुपयाची गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 25 हजार रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!