महिलांना दर महिन्याला मिळणार ₹7 हजार रुपये? LIC ची भन्नाट योजना सुरू, लगेच अर्ज करा

LIC Bima Sakhi Yojana: “बाई, रोजचा स्वयंपाक पाणी, लेकर सांभाळायचे आणि घर चालवायचे एवढेच आपलं काम नाही..” असं हल्ली गावातल्या महिला ठणकाहून सांगत आहेत. कारण काळ बदलतोय, आता स्त्रिया घरापुरत्या नाही तर समाजात आणि अर्थव्यवस्थेची पुढे यायला लागले आहेत. या बदलत्या काळात LIC ने ग्रामीण महिलांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. ती म्हणजे ‘विमा सखी योजना!’

या योजनेचा उद्दिष्ट अगदी सोपा आहे, महिलांना त्यांच्या पायावरती उभे करणे. म्हणजे घरात काम करून थुकून बसायचं नाही, तर आता स्वतःचे उत्पन्न कमवायचं, घरात मळतेचा हात बनवायचा! LIC Bima Sakhi Yojana

विमा सखी म्हणजे काय भाऊ?

भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणा मधून या योजनेची सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे ही योजना केवळ महिलांसाठी आहे आणि ती सुद्धा विशेषता ग्रामीण भागातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत महिलांना एलआयसी एजंट म्हणून प्रशिक्षित केलं जातं आणि कमावण्याची संधी दिली जाते.

महिलांना दर महिन्याला 7 हजार रुपये मिळणार!

या योजनेत महिलांना तीन वर्षासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिलं जातं. पहिल्या वर्षी दर महिन्याला सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी दर महिन्याला ₹6000 आणि तिसऱ्या वर्षी दर महिन्याला पाचशे रुपये टाइपेंड दिला जातो. म्हणजे एकूण तीन वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त आर्थिक मदत महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होते. पण एवढच नाही…

कमिशन सुद्धा मिळणार!

या प्रशिक्षण काळात जर महिलांनी विमा पॉलिसी विकल्या, तर त्यावर कमिशन मिळते. पहिल्याच वर्षात साधारण 48000 रुपयांपर्यंत कमिशन मिळू शकते. म्हणजे फक्त शिक्षण नाही, तर कमाई सुद्धा सुरू करा.

तीन वर्षाचा प्रशिक्षण झाल्यावर महिलांना विमा सखी म्हणून प्रमाणपत्र आणि एलआयसी एजंट कोड दिला जातो. मग त्या अधिकृतपणे विमा एजंट म्हणून काम करू शकतात. यात कोणताही मोठा खर्च नाही, फक्त हिम्मत हवी आणि शिकण्याची तयारी असली की महिलांसाठी नवीन वाट खुली आहे.

ही योजना देशभरामध्ये सुरू आहे. जमाईला इच्छुक आहे त्यांनी LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा. मोबाईल किंवा गावच्या कॉमन सर्विस सेंटर?(CSC) मधून सुद्धा हे शक्य आहे.

(Disclaimer : वर दिलेली माहिती प्रसारमाध्यम व सरकारी वेबसाईटच्या आधारे बनवलेले आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही त्यासाठी सखोल चौकशी करा.)

हे पण वाचा | LIC ची भन्नाट योजना! महिलांना मिळणार दर महिन्याला इतके रुपये, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment