LIC Bima Sakhi Yojana: देशातील व राज्यातील महिलांना स्ववलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. महाराष्ट्रातील सर्वत्र चर्चेत असलेले लाडकी बहिण योजना देखील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी तयार केलेले आहे. याच उद्देशाने सरकारने गेल्या वर्षी एलआयसी ची विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे दहावी उत्तीर्ण महिलांना चांगली कमाई करण्याची संधी मिळते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वय मर्यादा 18 ते 70 वर्ष दरम्यान आहे. आपण आता या योजनेसाठी अर्ज कसा करावा व या अर्जाचे वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
विमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा सात हजार रुपयापर्यंत कमाई करण्याची सरकारकडून संधी मिळते. मात्र या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वय मर्यादा निश्चित करण्यात आलेले आहे. जर तुम्ही भारतीय रहिवाशी असाल आणि तुमची वय मर्यादा 18 ते 70 दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी एजंट होण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. तीन वर्षात देशभरात दोन लाख पेक्षा जास्त महिलांना विमा सखी योजनेचे प्रशिक्षण देऊन त्या महिलांना स्वावलंबी बनवणे सरकारचा उद्देश आहे.
एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत पात्र महिलांना पहिल्या तीन वर्षासाठी स्टयपेंड देण्यात येणार आहे. महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलआयसी एजंट म्हणून त्या महिलांना काम सुरू करावे लागणार आहे. ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी मिळते. संपूर्ण देशभरातून तयार केलेल्या विमा सखीला प्रशिक्षण दरम्यान स्टायपेंड देण्यात येणार आहे. प्रथम वर्षी महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी महिलांना दरमहा सहा हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये याप्रमाणे देण्यात येतील. अशाप्रकारे महिलांना तीन वर्षात दोन लाखाहून अधिक कामाई करता येणार आहे. शिवाय त्या महिला आपल्या कमिशनच्या माध्यमातून उत्पादनात आणखीन वाढ करू शकतात.
विमा सखी योजनेसाठी केवळ देशातील महिलाच अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करणारी महिला 18 ते 70 वयोगटातील असणे आवश्यक आहे. पात्र महिलांना शासनातर्फे तीन वर्षाचे प्रशिक्षण देऊन दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा लाभ देखील घेऊ शकतात. पात्र महिलांना शासनातर्फे तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला विमा एजंट म्हणून संपूर्ण देशात कुठेही काम करू शकतात. LIC Bima Sakhi Yojana
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विमा सखी योजनेला अर्ज कसा करावा. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि खाली तुम्हाला click here for bhimasaki yojana, असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती अचूक भरा, जसे की नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि पत्त्यासोबत इतर माहिती भरा. तुम्ही एलआयसी इंडियाच्या कोणत्याही एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर कर्मचारी मेडिकल एक्सपोर्टशी संबंधित असाल तर त्या विषयी माहिती भरा. सर्वात शेवटी कॅप्चर कोड भरा आणि आपला फॉर्म सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा. या पद्धतीने तुम्ही विमा सखी योजनेला अर्ज करू शकतात.
1 thought on “सरकारची भन्नाट योजना महिलांना देणार 2 लाखापेक्षा जास्त नफा; असा करा अर्ज..”