लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले का? लगेच बँक खाते तपासा

Ladki Bhain Yojana Installment : महिलांना तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले का लगेच चेक करा, कारण अनेक महिलांचे खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. अशातच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी प्रसारमाध्यमांमध्ये माहिती देत सांगितले की महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये आता नक्कीच आनंद झळकणार आहे. हो खरंच महिलांनो तुमचे खाते चेक करा तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले का? Ladki Bhain Yojana Installment

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आतापर्यंत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढत चालली होती की मे महिन्याचे पैसे कधी जमा. परंतु आता अकराव्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे लाडकी बहिणीने आपले आधार लिंक असलेले बँक खाते तपासणे आवश्यक आहे. Ladki Bhain Yojana Installment

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी मोठी वरदान ठरली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतात. ऑगस्ट पासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमितपणे पैशा जमा झालेले आहेत. ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्जाची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर लाखो महिलांनी अर्ज भरले आणि पात्र देखील ठरल्या.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदा बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार ₹3,000? मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र

सध्या महिलांच्या खात्यात 10 हप्ते जमा झाले होते आणि आता अकरावा हफ्ता देखील जमा झालेला आहे. एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता देखील जमा होईल अशी अपेक्षा होती. मे संपला आणि जून महिन्यात हा हप्ता जमा झाला. परंतु आता मे महिन्यामध्ये जमा झाले नसल्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावर वाढले होते. परंतु आता जमा झाल्याने आनंदाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमी वरती अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला असून. त्या महिलांचे आधार कार्ड बॅंके लिंक आहे, हा निधी त्यांच्या खात्यात जमा होत आहे. काही महिलांना लगेच पैसे मिळतील, तर काहींना पुढील दोन ते तीन दिवसात जमा होतील.

दरम्यान मागील काही महिन्यांपासून अर्जाची सखोल छाननी सुरू असून, त्यात सरकारी कर्मचारी महिलांचे आणि अनेक योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांनाच हप्ता दिला जात आहे. त्यामुळे जर कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी आपले खाते, आधार लिंकिंग आणि अर्जाची स्थिती तपासावी.

हप्ता कसा तपासाल?

  • सर्वात प्रथम खात आधार लिंक आहे का, हे तपासा.
  • पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल, तरी खाता अपडेट करा.
  • बँकेत जाऊन स्टेटमेंट काढा किंवा मोबाईल ॲपवरून तपासा.
  • काहींनी दोन-तीन दिवस वाटपावी कारण उशीर होऊ शकतो त्यामुळे संयम ठेवा.

सरकारचा विश्वास आणि महिलांचा उत्साह

महिला मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सरकारच्या आणि महिलांच्या परस्पर विश्वासाचा उल्लेख करत म्हटलं, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना अधिक बळकट होत आहे. लाडक्या बहिणींचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमची योजनेची खरी ताकद आहे”.

तर आता लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर तुम्ही लगेच बँक खाते तपासा. कदाचित तुमच्या खात्यात देखील पंधराशे रुपये हप्ता जमा झाला असेल!

1 thought on “लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले का? लगेच बँक खाते तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!