Ladki Bahin Yojana: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न सतवत आहे. “लडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा आता कधी जमा होणार?” अनेक महिलांनी आपापल्या बँक खात्याकडे पुन्हा नजर टाकली, पण मे चा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. विशेष म्हणजे या योजनेवर संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य, मध्यमवर्गीय, आणि गरीब कुटुंबातील महिलांचा विश्वास आहे. कारण महिन्याला मिळणारे हे 1500 रुपये त्यांच्यासाठी घर खर्च, मुलांच्या शाळेची फी, औषधोपचार, किराणामाल यासाठी खूप मोठा आधार ठरतो. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 11 वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘ माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत आत्तापर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर जमा झाला होता. पण मे महिना संपवायला अवघे काहीच दिवस उरले असताना अजून पैसे खात्यात आलेच नाहीत. यावेळी महिलांमध्ये एक प्रकारची चिंता पसरली आहे. मात्र आता एक दिलासादायक अपडेट समोर आलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तब्बल 3.37 कोटी रुपयांच्या फाईली वरती सही केल्याची माहिती सध्या प्रसार माध्यमांमध्ये वायरल झालेली आहे. हे पैसे म्हणजे मे महिन्याच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आले असल्याची माहिती आहे. हे पैसे लवकरात महिलांच्या खात्यात जमा होतील असे संकेत देखील मिळाले आहेत.
गेल्या काही महिन्यांचा अनुभव पाहता, लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे बहुतांश वेळा महिलांच्या खात्यात महिन्याच्या अखेरीस जमा होतात. यामुळेही यंदा हे पैसे 28 ते 31 मे दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक कारणामुळे हे पैसे जमा झाले नाही तर, पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे जूनमध्ये एकत्रित तीन हजार रुपये जमा होतील अशी शक्यता प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे अजून काही दिवस संयम बाळगणे महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते.
योजनेत लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे आता सरकारने काटेकोरपणे पडताळणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्या महिलांनी नियम आणि निकषानुसार अर्ज केला आहे. त्यांनाच या योजनेचे पैसे पुढे मिळणार आहेत, आणि जे अर्ज अयोग्य आहे ते बाद केले जातील. अनेक भागातून फसवणुकीच्या घटनासमोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
या योजनेतून आतापर्यंत हजारो महिलांना वेळेवर मदत मिळाली आहे. घरामध्ये पुरुष कमवावत नसल्यास, विधवा महिला असोत किंवा गर्जवंत महिला असोत, या सगळ्यांसाठी हा हप्ता म्हणजे एक आर्थिक आधारस्तंभ आहे.
एका गावातील महिला सांगतात या 1500 रुपयांनी माझं किराणा निघतोय, मुलांच्या शाळेची फी भरते आणि औषधे विकत घेते. आता थोडा उशीर झालाय, पण पैसे येतील हाच आशेचा किरण जागतोय.
आता हा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. आणि कोणत्या महिलांच्या खात्यावरती किती रुपये जमा होतात हे देखील पाहणे गरजेचे आहे.