Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत जुलै महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडला आहे. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 देण्यात आले आहेत. दरम्यान जुलै महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार हा जुलै चा हप्ता ऑगस्ट महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनला मिळणारे 1500 रुपये?
यावर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या रक्षाबंधनच्या सणानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता देऊन गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैचा हप्ता थेट रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होऊ शकतो. गेल्या काही महिन्यापासून सणासुदीचे निमित्त साधून महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे यावेळीही तसेच होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर राज्यातील महिलांना रक्षाबंधनला खास गिफ्ट मिळू शकते.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता
मात्र याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही पैसे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला किंवा रक्षाबंधनाच्या आसपास महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. यामुळे अनेक महिलांचा रक्षाबंधनाचा आनंद डबल होणार आहे. सरकार याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा राज्यातील महिलांना आहे. Ladki Bahin Yojana
या महिलांना मिळणार नाही हप्ता
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या पडताळणीमध्ये सुमारे दहा लाख पेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.
- जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- तुम्ही कर भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- तुम्ही सरकारी नोकरीला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा या सर्व गोष्टीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही अपात्र असून देखील अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज बात केला जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेला नुकतेच एक वर्षे पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी 29 जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत लाखो महिलांना लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आधार मिळाला आहे. या योजनेमुळे अनेक महिला आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाल्या आहेत.