लाडकी बहीण योजनेत कोण पात्र? कोण अपात्र? अर्जाची तपासणी सुरूच; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

Ladki Bahin Yojana: मागील काही महिन्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात या योजनेची तपासणी केली जात आहे. कारण अनेक ठिकाणी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या योजनेतून जवळपास पाच लाखापेक्षा जास्त अर्ज बाद केले गेले आहेत. या योजनेतून बाद झालेल्या महिलांना यानंतर या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

हे पण वाचा | सुकन्या समृद्धी योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यावर किती लाख नफा मिळेल ? जाणून घ्या…

प्रसार माध्यमांमध्ये अशा अनेक बातम्या येत आहेत. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने अनेक जणांनी लाभ घेतला आहे. काही ठिकाणी लाडक्या भावांनीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. तर काही ठिकाणी चुकीची माहिती भरून या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ गैरप्रकाराने घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांकडून आर्थिक ला वापस घेतला जाणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या योजनेची पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेत चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे पडताळणी सुरू आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यानुसार महिला पात्र आहे का नाही हे तपासले जाणार आहे. या योजनेत अनेक महिलांना नियमात न बसताना देखील लाभ घेतला आहे. यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वयातील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांनी देखील या योजनेला अर्ज केले आहेत. आता अशाच महिलांची पडताळणी करून त्यांना या योजनेतून बाद केल्या जात आहे.

हे पण वाचा | सोन्याचे दर घसरले का वाढले? जाणून घ्या या आठवड्यात 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या दारात काय झाल्याबद्दल?

लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी होणार?
  • एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे का नाही याची तपासणी केली जाणार आहे.
  • चुकीचे कागदपत्रे सादर करून कुणी या योजनेचा लाभ घेतला आहे का याची देखील पडताळणी केली जाणार आहे.
  • कुटुंबातील कोणाला पेन्शन चालू असताना देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे का याची देखील पडताळणी होणार आहे.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांची चौकशी देखील केली जाणार आहे. आयकर विभागाच्या मदतीने ही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते ते देखील बाद केले जाणार आहेत. या पडताळणीसाठी प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका तपासणी करणार आहेत.

हे पण वाचा | बिझनेस आयडिया असावी तर अशी! दिवसाला फक्त चार-पाच घंटे काम करा आणि कमवा लाखो रुपये?

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार?

दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 फेब्रुवारीच्या आसपास महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या योजनेची पडताळणी सुरू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आणखीन महिला या योजनेतून अपात्र ठरू शकतात. Ladki Bahin Yojana

हे पण वाचा | घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार?

विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत आमचे सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना 1500 रुपये एवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिले होते. दरम्यान महायुतीचे सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले मात्र अजून देखील महिलांना 2100 रुपये मिळाले नाही. त्यामुळे महिलांकडून सारखा सारखा 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न विचारला जात आहे. यावर स्पष्टीकरण देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा यांनी सांगितले आहे की, येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत आमचे सरकार निर्णय घेणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? हा एक मोठा सवाल आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!