Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम सर्वसामान्य महिलांच्या जीवनात मोठा फरक घडवत आहे. घर खर्च असो वेदकीय गरजा असो किंवा छोट्या-मोठ्या व्यवसायिक गरजा असो ही रक्कम त्या भरून काढण्यासाठी मोठा दिलासा देत आहे. या योजनेअंतर्गत जून महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. यानंतर जुलै महिन्याच्या आपल्याबद्दल सध्या महिलांच्या मध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.
हे पण वाचा| उन्हाळ कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव
जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
सध्याची स्थिती पाहता जुलै महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही लाडके बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. यावेळेसही हप्ता उशिरा मिळणार का असा प्रश्न महिलांना पडला आहे. जून महिन्यासाठी ही महिलांना जुलै महिन्याची वाट पहावी लागली होती. त्याचप्रमाणे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा होईल की काय? असा प्रश्न महिलांना पडला आहे. दरम्यान जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होईल याबद्दल सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सरकारकडून सध्या तरी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेले नाही. जुलै महिन्यासाठी कोणती तारीख अधिकृतपणे जाहीर होईल याकडे सर्व राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट अनुसार महिना संपण्यापूर्वीच हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांनी फार चिंता न करता थोडे दिवस वाट पाहून तुमच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा झाले का नाही याची खात्री करून घ्यावी. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक मदतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये हे केवळ पैसे नसून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. महागाईच्या या काळात ही रक्कम महिलांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी खूप उपयोगी ठरत आहे. राज्यातील 21 ते 65 वय वर्ष असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान जुलै महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळेल असा प्रश्न पडत आहे.
हे पण वाचा| पुढील 3 दिवस राज्यात होणार जोरदार पाऊस; या भागात मुसळधार पावसाचा इशारा
कोणत्या महिला होणार अपात्र?
या योजनेचा लाभ राज्यातील गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारकडून लाभार्थी महिलांसाठी काही महत्त्वाची निकष ठेवण्यात आले आहेत. दरम्यान यांनी कशात न बसणाऱ्या महिलांना पडताळणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले आहे. काही विशिष्ट निकषानुसार अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील निकषाचे पालन न करणाऱ्या महिला अपात्र करण्यात आल्या आहेत.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे.
- सरकारी कर्मचारी किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला.
- ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे.
जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका निकषात बसत नसाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे हे लक्षात ठेवा.
जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता असल्याने महिलांनी आपले बँक खाते आणि मोबाईल नंबर सक्रिय ठेवावे. आपल्या मोबाईलवर येणाऱ्या एसएमएस वेळोवेळी तपासावे. कोणत्याही अधिकृत मेसेज किंवा बँकेकडून आलेली सूचना काय आहे याचे सक्षमीकरण करावे. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. थोडा विलंब होत असला तरी सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवली आहे. महिलांनी संयम ठेवून आपल्या बँकेच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे.
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर”