Ladki Bahin Yojana Update: राज्यातील अनेक महिलांसाठी आशेची किरण ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै 2024 पासून ही महत्त्वाकांशी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत होते. सुरुवातीला सर्व पात्र महिलांच्या खात्यात नियमितपणे पंधराशे रुपये जमा होते. मात्र आता अनेक महिलांच्या खात्यावरती फक्त पाचशे रुपये जमा झाले चे समोर आले आहे. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाला आहे आणि त्यांच्यात मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.Ladki Bahin Yojana Update
यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ज्या महिलांना केंद्र सरकारच्या Pm किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे. अशा महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पूर्ण ₹1500 रुपये दिले जाणार नाहीत, त्या ऐवजी त्यांना दरमहा फक्त ₹500 रुपयांचे सहाय्य दिले जाईल, अशी शक्यता पष्ट करण्यात आली आहे.
जुलै 2024 मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली, तेव्हा जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीत एकूण नऊ महिन्यांचे पैसे महिलांना मिळाले आहेत. बहुतांशी महिलांना सुरुवातीला पंधराशे रुपये मिळाले होते. परंतु आता एप्रिल महिन्यांचे पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना अचानक अनेक महिलांच्या खात्यावरची पाचशे रुपयांचा लाभ जमा होणार आहे. अशातच अक्षय तृतीय सरकार पंधराशे रुपये पाठवणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. मात्र प्रत्यक्षात किती रक्कम येते याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.
तसेच, राज्य सरकारने ठरविले आहे की, ज्यांना आधीपासूनच कोणतीही शासकीय योजनेचा फायदा मिळतोय, त्यांना लाडकी बेन योजनेचे पूर्ण पंधराशे रुपये मिळणार नाहीत. उदाहरणार्थ, निराधार अनुदान योजना, पीएम किसन योजना, नमो शेतकरी योजना यासारख्या योजनेची लाभार्थी असलेल्या महिलांना पूर्ण रक्कम न देता केवळ पाचशे रुपये देण्यात येणार आहेत. निराधार योजना लाभार्थींना तर थेट या योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे.
PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना दरवर्षी सरकार 6000 रुपये देतात. दोन्ही योजनेचे मिळून एका वर्षात बारा हजार रुपये मिळवतात. म्हणूनच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, या महिलांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये ऐवजी उरलेले सहा हजार रुपयांचा हिशोब दरमहा पाचशे रुपये प्रमाणे केला जाणार आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात अर्थ करणारा बहुतांशी महिलांना थेट ₹1500 रुपये मिळतात. पण आता विविध यंत्रणामार्फत पात्रतेचे तपासणी सुरू आहे. प्रत्येक अर्जदार महिलेची माहिती क्रॉस चेक केली जात आहे आणि कोणतीही महिला कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे याची खातरजमा करून मगच निर्णय घेतला जात आहे. ज्यामुळे ज्या महिलांना अन्याय योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
सध्या या योजनेचे नियम सातत्याने बदलत आहेत आणि त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. काहींना पंधराशे मिळाले, तर काही नकाशे रुपये तर काहींना अजून पैसेच मिळाले नाही. त्यामुळे दर महिन्याला योजने चे बदलते नियम, पात्रतेची नव्याने पडताळणी आणि खात्यावर जमा होणारी रक्कम याबाबत महिलांना अचूक व अधिकृत माहितीची गरज आहे.
तथापि, सरकारकडून लवकरच योजनेबाबत अंतिम आणि स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ज्या महिलांना शंका आहे, त्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासावी आणि आपल्या खात्यावर कोणत्या योजनेचा लाभ मिळतो आहे याबाबत खात्री करून घ्यावी, असे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?