या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महिलांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.यानंतर महिला आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची रक्कम 1500 रुपये एवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबत अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. आता कोणत्या महिलांना मे महिन्यात तीन हजार रुपये मिळणार असा प्रश्न महिलांसमोर उपस्थित झाला असेल. तर याचबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवणे लाडकी बहिणी योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा दहा महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीपासून लाभ घेणाऱ्या महिलांना एकूण 15000 रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. राज्यातील गोरगरीब महिलांसाठी ही रक्कम खूप मोठे असून या रकमेतून त्यांनी आपले घर चालवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. सरकारने सुरू केलेली ही योजना लाखो गरीब महिलांच्या कुटुंबाचे आधार बनले आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार मे महिन्याचा हप्ता; ₹1500 मिळणार का ₹2100?

या लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1500 रुपये दिले जात आहेत. तर काही महिलांना अजूनही एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसल्यामुळे ज्या लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना मी आणि एप्रिल अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. या महिलांना एप्रिल महिन्यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळाले नाहीत. परंतु लाडकी बहिणी योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हे पैसे मे महिन्यात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तर तुमचा लाभ बंद केला जाऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा काही कारणास्तव काही महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. आता त्यांना मे महिन्यात तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana

हे पण वाचा | पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का? जाणून घ्या मोबाईलवर

मे महिन्यात हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या दोन तारखेपासून महिलांच्या खात्यात जमा झाल्यास सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना मिळाल्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. दरम्यान मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेअंतर्गत मे महिन्यात देखील महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात किती तारखेला जमा होईल याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी कोणत्याही फसव्या बातमीवर विश्वास ठेवू नये.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!