Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान या योजनेअंतर्गत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सरकारने या योजनेची छाननी प्रक्रिया सुरू केली होती. आयकर विभागाच्या मदतीने केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
यामुळे महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत आयकर विभागाच्या डेटा चा वापर करून आयकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणाऱ्या लाभ बंद करण्यात येणार आहे. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे ही अट ठेवण्यात आली होती. मात्र अनेक महिलांनी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून देखील या योजनेला अर्ज केला आणि या योजनेचा लाभ घेतला आहे.
हे पण वाचा | पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..
आयकर विभागाने सध्या 2.52 कोटी अर्जाची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जात आहेत. पूर्वीच्या तपासणीत 2 लाख अर्जापैकी 2289 सरकारी कर्मचारी लाभार्थी आढळल्या होत्या. त्यांची नावं तात्काळ या योजनेतून उठवण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ही तपासणी करणे आवश्यक असून योग्य त्या पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा असे स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवला जात आहे. विरोधाकांकडून या योजनेचा दुरुपयोग केला जात आहे. ही योजना बंद होणार अशा चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत तेव्हापासून त्यांना आता लाभ देणे बंद केले आहे. असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळवा दुप्पट नफा! ₹1 लाखाचे ₹2 लाख मिळतील…
लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे. सध्या या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला असून या हप्त्यासाठी 3719 कोटी रुपये निधी लागला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये काही चुका झाल्याची कबुली खुद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यासह पात्र नसलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निकषाच्या चौकटीत न राहता अनेक महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहे मात्र आता अशा महिलांना या योजनेतून बाद केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या योजनेची निकषानुसार आता पात्र महिलांच्या अर्जाचे पुन्हा छाननी सुरू करण्यात आलेली आहे.