Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलै च्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिना अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता एकत्रित मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. जर लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र दिले तर 3000 रुपये मिळू शकतात.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता लवकरच जमा केला जाऊ शकतो. जुलै चा हप्ता या महिने अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. दरम्यान आता जुलै आणि ऑगस्ट चे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये सांगितले जात आहे. दर महिन्याच्या शेवटी किंवा सणासुदीचे निमित्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधनचा सण आहे त्या दिवशी महिलांना 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन चांगले होऊ शकते. महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3000 रुपयांचे गिफ्ट मिळू शकते.
हे पण वाचा| महाराष्ट्रातील लेकींना मिळणार 1 लाख रुपये! योजनेसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर..
या महिलांना मिळणार नाहीत पैसे
लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाद केले जात आहे. या योजनेअंतर्गत पडताळणी सुरू असल्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. या योजनेतून जवळपास 10 लाख महिलांना अपात्र केले जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना बाद केले जात आहे. तसेच ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत त्यांच्या देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे. ज्यांच्या घरात चार चाकी वाहन आहे त्यांना देखील या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. Ladki Bahin Yojana Scheme