Ladki Bahin Yojana Scheme: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार नसल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेड मधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापराव पाटील चिखलीकर आल्यापासून तीन हजाराहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुखेड येथील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजने संदर्भात नवीन प्रस्तावा बाबत माहिती दिली.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना मे महिन्यात 3,000 रुपये मिळणार; तुम्हालाही मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रातील सर्वत्र सुप्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील गोरगरीब महिलांना दरमहा 1500 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. सरकार बँकेशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणारे 1500 रुपये बँकेकडे जमा होतील असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
हे पण वाचा | ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले पीक विम्याचे 159 कोटी रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती..
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हटले इथं लाडक्या बहिणी बसल्या आहेत मला त्यांना सांगायचं आहे. कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देतो. च्या लाभार्थी महिला त्यात बसतात त्यांना योजना बंद करणार नाही. या योजनेतून लाडक्या बहिणींना मदत होते. आम्ही एक प्रस्ताव समोर आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेची बोलणार आहे अशी अजित पवार यांनी म्हटले आहे. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगले आहेत. आमच्या सरकारकडून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले जातात त्याऐवजी भगिनींना 30 ते 40 हजार रुपये कर्ज द्यायचे, या कर्जाचा हप्ता लाडके बहिण योजनेच्या लाभातून पाठवला जाईल.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार मे महिन्याचा हप्ता; ₹1500 मिळणार का ₹2100?
लाडक्या बहिणी 40 हजार रुपयांचे भांडवल मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यातूनच त्यांचे कुटुंब ही उभा राहू शकते. अशाप्रकारे महिला त्यांच्या पायावर उभा राहू शकतात. महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माजी आमदारांना पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे ती योजना कशी आहे. सरकारने दिलेल्या योजनेचा चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे अशी विनंती असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
भारताने पाकिस्तान विरुद्ध कणभर भूमिका घेतली पर्यटकावर जो हल्ला झाला. त्यामुळे संपूर्ण भारतीय नागरिक देशात पेटून उठले आम्हाला बदला घ्यायचा होता त्यावर सरकारने दहशतवाद्याला चूक उत्तर दिले. अशा अनेक गोष्टीवरून अजित पवार यांनी आपली भाषण पूर्ण केले. दरम्यान आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे अजित पवार यांनी प्रस्ताव मांडला आहे. सरकारकडून राज्यातील महिलांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा योग्य उपयोग कसा होईल याबद्दल अजित पवार यांनी सांगितले आहे. Ladki Bahin Yojana Scheme
हे पण वाचा | पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का? जाणून घ्या मोबाईलवर
मे महिन्यात हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत आतापर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला आहे. यानंतर राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मे महिन्याच्या दोन तारखेला मिळाला आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता या महिन्यात मिळणार का पुढील महिन्यात मिळणार असा देखील संभ्रम महिलांमध्ये निर्माण झाला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर लाडकी बहिणी योजना बंद होणार अशी देखील टीका लोकांकडून केले जात आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठे वक्तव्य देखील केले आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे लाडकी बहिणी योजना आम्ही बंद पडू देणार नाही. या योजनेच्या हप्ता देण्यामध्ये थोडाफार मागेपुढे होऊ शकतं पण योजना बंद होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही फसव्या बातमी पासून सावध राहावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
2 thoughts on “लाडक्या बहिणींना आता मिळणार 40 हजार रुपये कर्ज; अजित पवारने केली मोठी घोषणा..”