Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली! पण ऑगस्टचे ₹1500 कधी मिळणार?


Ladki Bahin Yojana Scheme: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे रक्षाबंधन सणासाठी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हप्ते उशिरा मिळत असल्यामुळे महिलांमध्ये थोडे चिंता व्यक्त होत आहे. आता रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे मिळणार असल्यामुळे त्यांच्या आनंदाला नवीन उधान निर्माण झाले आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख निश्चित झाली असली तरी आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना सतावत आहे.

हे पण वाचा| खुशखबर! लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितली तारीख…

मागील काही महिन्यांच्या नियमावलीनुसार दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात. जुलै महिन्याचे पैसे देण्यासाठी उशीर झाला त्यामुळे महिलांना रक्षाबंधन निमित्त जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त जुलै महिन्याचे पैसे मिळतील अशी घोषणा केली. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान ऑगस्टचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा अजून केलेली नाही. तरीही महिलांना आशा आहे की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळतील. Ladki Bahin Yojana Scheme

लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या योजनेतून तब्बल 42 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सरकारी नियमानुसार ज्या महिलांनी निकषाचे पालन केले नाही त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांच्या अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे काही प्रमाणामध्ये नाराजी असली तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निकषाचे पालन होणे खूप गरजेचे आहे. योग्य महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा पैसा मिळावा त्यासाठी ही कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली! पण ऑगस्टचे ₹1500 कधी मिळणार?”

Leave a Comment

error: Content is protected !!