लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार

Ladki Bahin Yojana Scheme: राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. लाडक्या बहिणींना मागील सात महिन्यापासून या योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत एकूण दहा हजार पाचशे रुपये देण्यात आले आहेत. यानंतर महिलांना फेब्रुवारी महिन्याची प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हाच प्रश्न पडला आहे. आता या महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सात महिन्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून महायुती सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात आले आहेत. सरकारकडून देण्यात येणारी ही रक्कम महिलांना दैनंदिन जीवनात आर्थिक गरजा भागवण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! योजनेमध्ये नवीन नियम लागू?

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

सध्या राज्यातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना हा फक्त 28 दिवसाचा असल्यामुळे या महिन्याचे पैसे 20 तारखेच्या आसपास महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Ladki Bahin Yojana Scheme

दरम्यान मागील दोन-तीन हप्ते जसे की डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात आला. इतर महिन्याच्या हप्ते वेळेत जमा झाल्यामुळे महिला फेब्रुवारी महिन्याचे हप्त्याची वाट देखील पाहत आहेत. हा हप्ता येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्याची तारीख जाहीर झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारच्या बड्या नेत्याने आमचे सरकार पुन्हा एकदा स्थापित झाले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. दरम्यान महायुती सरकारची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. मात्र लाडक्या बहिणींना अजून देखील 2100 रुपयाचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणीकडून 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत आमचे सरकार निर्णय घेईल. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना किती रुपये मिळतात हे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा | सरकारची भन्नाट योजना महिलांना देणार 2 लाखापेक्षा जास्त नफा; असा करा अर्ज..

लाडक्या बहिणींची छाननी सुरू

दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची छाननी सुरू आहे. या छाननी दरम्यान ज्या महिला या योजनेच्या निकषाचे व अटीचे पालन करत नाहीत त्या महिला अपात्र ठरवण्यात येत आहेत. दरम्यान या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ सोडवण्यासाठी अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत कोणत्या महिला अपात्र होणार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया.

  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेतून अपात्र ठरवल्या जात आहेत.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन आहे त्या महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत.
  • ज्या महिला लाडकी बहीण सोडून इतर आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील त्या महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत.
  • ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीला आहे आणि महिलाच्या कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भरत आहे अशा महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत.
  • ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान नाही त्या महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत.

हे पण वाचा | आज पुन्हा सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यात तब्बल पाच लाख महिला अपात्र झाल्या आहेत. यानंतर फेब्रुवारी महिन्यात किती महिला या योजनेतून अपात्र ठरतील हे पाहण्यासारखे राहणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवण्यापूर्वी या योजनेची छाननी पूर्ण होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेची छाननी वेगाने सुरू असल्यामुळे लवकरच याबाबत पुढील अपडेट मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!