Ladki Bahin Yojana News: राज्यातील महायुतीच्या सरकारच्या काळात मोठ्या गाजवाजाने जाहीर करण्यात आलेली “लाडकी बहीण योजना” सध्या आर्थिक अडचणीच्या भवरास सापडल्याचे स्पष्ट होत आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच थेट सांगितलं की, “1500 चे 2100 रुपये होणे शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे.” Ladki Bahin Yojana News
सरकारने सुरुवातीला महिलांना आर्थिक हातभार म्हणून पंधराशे रुपये देण्याच्या जाहीर केलं होतं. त्यानंतर हा रक्कम वाढून ₹2100 रुपये देण्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या तिजोरी वरती सध्या मोठा आर्थिक ताण आहे आणि लाडकी बहीण योजना सारख्या योजनांवर त्याचा थेट परिणाम होतोय.
संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद बोलवत सांगितलं. माझे जवळपास 3000 कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंत्र्यांनी महिनाभर पूर्वीच पत्र दिला आहे. खात्याचा सहानभूतीने विचार व्हावा आणि जे पैसे नियमानुसार आहे ते मिळावे अशी विनंती केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “दलित, कल्पक संख्यांसाठी सुविधा पुरवणाऱ्या खात्याच्या निधीतून पैसे कमी करण्यात येत आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे द्यायचे असतील तरी तर मार्ग शोधा. माझ्या खात्यावर अन्याय करून उपयोग नाही”.
पुढे म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आले, त्यामुळे ती योजना चालू ठेवायलाच हवी. पण त्यासाठी इतर खात्यांचा निधी कमी करणे योग्य नाही. शासनाच्या इतर योजनाही त्यामुळे ठप्प होऊ शकतात. काही मुलांना पैसे देता आले नाहीत.
त्यांनी नमूद केले की, “बजेट विधिमंडळात पास झाले म्हणजे काही बदल शक्य नाही, असं नाही. परंतु देताना नियोजनबद्ध आणि परिपूर्ण द्या. माझ्या खात्याच्या निधीत कट केल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.”
राज्यावर आर्थिक भर आहे हे सत्य आहे पण त्यासाठी मार्ग आहेत. कदाचित कर्ज काढावा लागेल. मात्र 2100 रुपये देता येणार नाहीत. पंधराशे रुपये देण्याची तयारी आहे. अशी स्पष्ट कबुली शिरसाट यांनी दिली.
यांचा इशारा होता की, लाडकी बहीण योजना बंद करायची आमची इच्छा नाही. आमचं वचन पूर्ण करायचं आहे. पण त्यासाठी इतर खात्यावर अन्याय नको.
अजित दादांशी बोललो आहे, पण कोणावरही राग नाही
पत्रकारांच्या प्रश्नात उत्तर देताना शिरसाट म्हणाले, अजित दादांशी बोललो आहे. पण कोणावर रागावलं, हा मुद्दा नाही. माझ्या खात्याच्या गरजांकडे लक्ष द्या, एवढीच विनंती. कोणता शकुनी मामा कडून अफवा पसरवल्या जात आहेत, असं काही देणं घेणं नाही.
हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती