Ladki Bahin Yojana News: राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात लडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. या योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या महिलांवरती राज्य सरकारने कठोर पाऊल उचललेले आहे. मुंबईमधील 22000 महिलांना या योजनेच्या लाभातून वगळले गेले आहे. Ladki Bahin Yojana News
योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्जदार
लाडकी बहीण योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने सुरू केले या योजनेमध्ये काही पात्रता निकष आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने कोणतेही निकष न पाहता सरसकट महिलांना या योजनेचा लाभ दिलेला होता. परंतु आता सरकारने या निकषावर पुन्हा एकदा विचार करून पात्रता तपासण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरणार अशी बातमी समोर आलेली आहे
हे पण वाचा | Astrology 2025: 30 वर्षानंतर या ग्रहांची युती; या राशींना मिळणार मोठा लाभ!
मुंबईमध्ये 22000 महिला अपात्र ?
समाज माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची पडताळणी सुरू केलेली आहे. या पडताळणी दरम्यान मुंबईमध्ये 22000 महिलांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
या अपात्र ठरलेल्या महिलांमध्ये–
- ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना अपात्र ठरवले.
- नोकरी करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले.
- अन्य सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अपात्र ठरवले.
अशा महिलांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या नवीन निकषानुसार ज्या महिलांकडे स्वतःची किंवा कुटुंबाच्या नावावरती चार चाकी वाहन आहे. त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तसेच स्वतः नोकरी करणाऱ्या महिलांना देखील या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे.
राज्य सरकारने कठोर कारवाई केली
राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या महिलांवरती कठोर कारवाई केलेली आहेत. ज्या महिलांनी या योजनेचे निकष डावलून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा महिलांवरती राज्य सरकारकडून आता कठोर कारवाई केली जात आहे. अपात्र महिलांकडून मिळालेले आर्थिक मदत परत घेतली जाऊ शकते अशी देखील शक्यता, सध्या समाज माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.
योजनेची चौकशी कशी सुरू आहे ?
महिला व बाल विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने योजनेचा लाभार्थ्यांची पुनर तपासणी सुरू केलेली आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जात आहे. तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रवेशिका आणि अंगणवाडी सेविका या घराघरात जाऊन लाभार्थ्यांची चौकशी करत आहे. या चौकशी दरम्यान लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती आणि चार चाकी वाहन मालकाची तपासणी केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत ?
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास किंवा आयकर भरत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरदार महिला संजय गांधी निराधार योजना किंवा अन्य सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबाच्या नावावर चार चाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरणार आहे.
सरकारची कठोर भूमिका
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेअंतर्गत फक्त गरीब आणि गरजू महिलांना लाभ मिळणार आहे ज्या महिला पात्र ठरले आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेले आर्थिक मदत देखील सरकार परत घेणे जाण्याची शक्यता समाज माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे औषध कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना अर्जदारांनी योग्य आणि खरी माहिती देणे गरजेचे आहे.
महिलांसाठी महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेतून राज्यातील अनेक महिला अपात्र ठरणार आहेत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील 22000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अपात्र अर्जदारांनी विरोधात सरकार कठोर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही कारवाई इतर जिल्ह्यांमध्ये केली जाऊ शकते भविष्यात योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्याची अपेक्षा आहे.
6 thoughts on “लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र”