राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांचे नावे यादी मधून वगळले, तुमचे नाव चेक करा

Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर या योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेचा काही लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Ladki Bahin Yojana News

सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांची उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली आहे. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच महिलांना लाभ मिळणार आहे. तसेच, ज्या कुटुंबाचे वर्ष उत्पन्न अडीच लाख रुपयांचा जास्त आहे, अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेमधून वागण्यात येणार आहे. इतर योजनेचा लाभ घेत असल्याचाही तपासणी करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत दरवर्षी जूनमध्ये लाभार्थ्यांनी त्यांचे सर्व माहिती सादर करावी लागेल. आतापर्यंत या योजनेमुळे दोन कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केलेली आहे. परंतु त्यापैकी दोन कोटी 41 लाख महिला पात्र ठरलेले आहेत. मात्र गेल्या आठवड्यामध्ये या योजनेच्या आणि निकषांचे पालन करता गैरफायदा घेणाऱ्या सुमारे पाच लाख महिलांना पात्र ठरविण्यात आलेले आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत गेल्या सात महिन्यांमध्ये सुमारे 25,250 कोटी रुपये लाभार्थ्या महिलांना वाटप करण्यात आलेले आहेत. या पैशाचा वाटप नंतर योजनेत होत असलेल्या उधळपट्टीवर लगाम घालण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामुळे यापुढे फक्त योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे अनेक महिला या योजनेमधून अपात्र होणार असल्याची माहिती देखील सध्यासमोर आलेली आहे.

तसेच ज्या महिला या योजनेमध्ये अपात्र आहे. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे बातमी समोर आली होती. परंतु मध्यंतरी या विषयावर मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर दिले आहे की, या योजनेमध्ये ज्या महिला अपात्र ठरले आहेत त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही परंतु त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे.

तसेच, महिलांना फेब्रुवारी हप्त्याच्या लाभाकडे लक्ष लागलेले आहे. फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याची आतुरताने महिला वाट पाहत आहेत. परंतु अद्याप शासनाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे हा हप्ता कधी जमा होणार याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!