लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! महिलांना ₹1500 रुपये मिळणार नाही?


Ladki Bahin Yojana News | गेल्या वर्षभरामध्ये अनेक महिलांसाठी आधार ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेमध्ये आलेली आहे. आता या वेळेचे कारण म्हणजे चांगलंच मोठ कारण आहे. आणि हे महिलांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावरती अर्जाची छाननी सुरू असून, जालना आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 87 हजार अर्ध रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता त्या लाभार्थी महिलांना दर महा मिळणारी ₹1500 रुपयांची रक्कम थांबणार आहे. Ladki Bahin Yojana News

अपात्र ठरलेल्या महिलांना धक्का!

राज्य सरकारच्या या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असून आयकर विभागाच्या सहकार्याने अर्जाची छाननी सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये अनेक महिलांचे अर्ज विविध करणारी रद्द करण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 57,000 अर्ज तर नागपूर मध्ये 30,000 अर्ज रद्द झालेले आहेत. त्यामुळे हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे आता स्पष्ट झालेल आहे.

कोण-कोण अपात्र ठरतंय?

सरकारने या योजनेसाठी ठरवलेल्या काही स्पष्ट अटी आहेत. त्यापैकी काही कारणांमुळे अर्ज बाद झालेले आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असणे, चार चाकी वाहन असणे, घरात सरकारी नोकरदार असणे, इतर योजनेचा लाभ घेतलेला असणे, ( जसे की संजय गांधी निराधार, तर वृद्धकाळात काही योजना वगैरे) वयाचा निकष पूर्ण न होणे.

जालना जिल्ह्यामध्ये एकूण 5.42 लाख अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातील 57 हजार अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे आता फक्त 4.84 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर पासून नवीन नोंदणी बंद करण्यात आलेली होती. आणि नुकत्याच झालेल्या छाननीनंतर अपात्र महिलांच्या खात्यावर पैसेही थांबणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून पष्ट करण्यात आलेला आहे.

तर नागपूर जिल्ह्यामध्ये 10.73 लाख अर्जापैकी सुमारे 30 हजार अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. यात कार असलेल्या, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला, आणि इतर योजनांचे लाभार्थी असलेल्यांचा समावेश आहे. सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, अधिक अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे आता या दोन जिल्ह्यातील महिलांना ज्या अपात्र ठरलेले आहेत. त्यांना यापुढे लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जर तुम्ही देखील लाभार्थ्यांपैकी एक असेल आणि तुम्ही अपात्र ठरत असाल तरी बातमी तुमच्यासाठीच आहे. पर्यंत अद्याप सरकारकडून दिलेली रक्कम परत वसूल करणार का याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!