लाडक्या बहिणींना, फेब्रुवारी महिन्याचे ₹1500 रुपये या तारखेला मिळणार? वाचा सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana news : राज्यातील महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारी मध्ये कधी जमा होणार याची अपडेट समोर आलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.Ladki Bahin Yojana news

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या बदल झालेला असून, पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ठराविक तारखे नंतरच मिळणार आहे. राज्य सरकारकडून निकषानुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता काही काळ विलंबित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. परंतु हा हप्ता कधी जमा होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे महिलांनी विचलित होण्याचे कोणतेही कारण नाही.

राज्यात 5.50 लाख महिला अपात्र

प्रसार माध्यमांमध्ये अनेक वेगवेगळ्या बातम्या सध्या प्रसार होत आहेत. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये जवळपास 5.50 लाख महिला अपात्र झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे. या योजनेमध्ये अडीच कोटी महिला लाभार्थी असून दरमहा या महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना काही महिलांनी स्वतःहून लाभ नाकारल्यामुळे आतापर्यंत या योजनेमध्ये 5.20 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत.

हे पण वाचा | लाडक्या बहिण योजनेतील महिलांवरती मोठी कारवाई; तब्बल 22 हजार महिला ठरल्या अपात्र

चार चाकी वाहनांच्या पडताळणीमुळे लाभ विलंबित.

योजना राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेले आहेत. ज्या महिलांच्या नावावर ते चार चाकी वाहन आहे. त्यांची सध्या पडताळणी सुरू झालेली आहे. राज्य सरकारने या यादींचे अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी पडताळणी सुरू केलेली आहे.

मार्चमध्ये मिळणार फेब्रुवारी चा हप्ता

लाडकी बहीण योजनेचा पडताळणीचा निकाल आठ दिवसांमध्ये शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतरच फायनल यादी तयार होईल आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ पातळ महिलांना वितरित केला जाईल. त्यामुळे लाभ मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

योजनेत आणखी महिलेची संकेत कपात होण्याची शक्यता

सध्या चालू असलेल्या पडताळणीमुळे आणखी काही महिला अपात्र ठरल्या जाऊ शकतात. चार चाकी वाहन, आर्थिक स्थैर्य, तसेच अन्य निकषांच्या आधारे योजना अधिक पारदर्शक केली जाणार आहे. आतापर्यंत योजनेसाठी 85.20 कुटी रुपयांचा खर्च कमी झालेला आहे. आणि ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( या योजनेच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा आणि अजून शासकीय माहितीसाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावरती नजर ठेवा)

Leave a Comment

error: Content is protected !!