मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाचा मोठा निर्णय! नवीन GR समोर

Ladki Bahin Yojana Latest Update : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे महिलांचे अर्ज अपात्र होणार का? व शासनाने नवीन निर्णयांमध्ये काय सांगितले आहे हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Ladki Bahin Yojana Latest Update

राज्याच्या तिजोरी वरती निर्माण झालेली आर्थिक तुटीमुळे अनेक लोकप्रिय योजना बंद होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. विशेष म्हणजे गरिबांसाठी राबवली जाणारी शिवभोजन थाळी आणि आनंद शिधा या योजनेचा भवितव्यावर सरकार विचार करत असल्याचे समोर आलेले आहे. मात्र अशा चर्चा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपयांचा खर्चला मान्यता देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा | Pm Kisan Scheme : 24 फेब्रुवारी रोजी 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, लाभार्थ्यांची नाव चेक करा

लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रचार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा केले आहे. त्यानंतर आता महिलांच्या खात्यावरती दोन हप्ते जमा केलेले आहेत. परिणामी या योजनेमुळे महायुती सरकारला भरभरून यश मिळालेले आहे.

मात्र, यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. संपूर्ण देशभरामध्ये मोठा विजयाच्या पार्श्वभूमी वरती महाराष्ट्रात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवलेल्या आहेत.

योजना लोकप्रिय, पण निधी अपुरा ?

महायुती सरकारला निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती मोठे भरभरून यश मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मिळाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी 200 कोटी रुपयांचा माध्यम आराखडा मान्यता दिलेली होती. त्या अंतर्गत आता सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर ते जाहिराती प्रसिद्ध साठी प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

परंतु, राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. इतर योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. शिव भजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती मोठ्या घोषणा केलेले आहेत. मात्र त्यासाठी पैसा उभारणे आव्हानात्मक ठरत आहे.

राज्यातील प्रमुख योजनेचा खर्च

राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या काही प्रमुख योजनेसाठी प्रचंड आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे.

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – 46,000 कोटी रुपये
  • मुलींना मोफत उच्चशिक्षण योजना – 18000 कोटी रुपये
  • मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना – 5,500 कोटी रुपये
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना- 1,300 कोटी रुपये.
  • मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना – 14,761 कोटी रुपये.
  • लेक लाडकी योजना – 1,000 कोटी रुपये.
  • गाव तिथे गोदाम योजना – 341 कोटी रुपये.
  • मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना – 400 कोटी.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना – 480 कोटी रुपये.

सरकार पुढील आर्थिक संकट!

राज्यामध्ये सरकारवर आर्थिक योजनेमुळे मोठे संकट आलेले आहे. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सरकारने काही योजना आटोपत्या करणे किंवा त्याच्यात खर्च कपात करणे गरजेचे मानले जात आहे. शिव भोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना यांच्यासह इतर काही योजनेच्या भवितव्याबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष

राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय ठरलेले आहे. या योजनेचा राज्यातील महिलांसाठी मोठा प्रभाव ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र, राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, सरकारला इतर योजनेचे पुनारलोकन करावे लागणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्य सरकारकडून होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या निर्णयामध्ये लाडकी बहिणीसाठी कोणता निर्णय घेतला जाणार याची आतुरता सर्व महिलांना लागलेली आहे.

error: Content is protected !!