Ladki Bahin Yojana Latest News: शिंदे सरकारने लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता महिलांना पंधराशे रुपये नवे तर डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार आहेत याबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे. गेले काही दिवसांपासून महिलांमध्ये अनेक चर्चा रंगत होत्या. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार यामुळे महिला विचारात पडल्या होत्या. परंतु काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महिलांना मे महिन्यामध्ये एप्रिल आणि महिन्याचा दोन्ही हप्ता एक सोबत दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे यावेळेस महिलांना तीन हजार रुपये सोबत मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना ही एक आर्थिक स्त्रोत बनले आहे ज्यामुळे थोड्याशा पैशांचा आधार होतो. हि योजना म्हणजे शासनाचे महिलांसाठी एक खंबीर पाऊल आहे. आता या योजनेच्या माध्यमातून मिळणारा दर महा लाभ पंधराशे रुपयांचा लाभ थेट 3000 रुपये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होय चक्क दुप्पट!
शासनाने ही योजना सुरू केली जुलै 2024 पासून, आणि तेव्हापासून दर महिन्याला महिलांना योग्यतेच्या आधारे 21 ते 65 वर्षे व या गटातील विधवा, परितक्ता, निराधार, विवाहित महिलांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत जुलैपासून मार्चपर्यंत एकूण नऊ हप्त्यते 13500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहेत. या पैशांचा उपयोग कोणी मुलांचे शिक्षण भरायला करतोय, कोणी किराणा आणायला, तर कोणी घर चालवायला थोडक्यात या या पैशांनी खरच बहिण बहिणींचा हसत खेळत जगणं थोडंफार सावरले.
पण आता एप्रिल संपायला अवघे काही दिवस उरले असताना एक नवीन चर्चा गावांमध्ये आणि शहरांमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. यावेळेस एप्रिल आणि मे महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का? म्हणजे पंधराशे नव्हे तर चिट 3000 रुपये खात्यात जमा होणार? मीडिया रिपोर्टनुसार याचे उत्तर हो असं असू शकतं. कारण याआधी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते ८ मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त एकत्रित जमा करण्यात आले होते, त्याच धर्तीवर ती आता एप्रिल आणि मे चे पैसे एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचं म्हणजे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी खुद सांगितला आहे की एप्रिलचा हप्ता एप्रिल संपायच्या आत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सरकार 30 एप्रिल ला येणाऱ्या अक्षय तृतीयेला हा लाभ वितरित करू शकता. पण जर तसं झालं नाही, तर मे महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये पडण्याची शक्यता आहे.
ही रक्कम काही जास्त नाही असं शहरात राहणाऱ्या लोकांना वाटेल, पण गावातल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी याचा अर्थ खूप मोठा आहे. यातून त्या किराणा, औषध, शाळेचा खर्च, छोटे मोठे संसाराचे निर्णय घेऊ शकतात. या योजनेंनी अनेक बायकांचे मुलांचे ममतत्व, स्वाभिमान आणि आत्मभान जपून ठेवले.
आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. एप्रिलचा हप्ता एकता मिळतो का की सोबत मिळतो हे पाहण्यासारखे राहणार आहे. पण या गोष्टी नक्की, सरकारने जर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले तर हे हा खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणार आहे.
हे पण वाचा | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?