Ladki Bahin Yojana Latest News: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहिन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची ठरू शकते. कारण यापुढे लाभलेले बंद होणार ? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Latest News
राज्य शासनाने जुलै महिन्यामध्ये महिलांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, ही योजना राज्यातील 21 ते 65 वर्ष वया गटातील महिलांसाठी एक मोठी आर्थिक स्त्रोत बनलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यावरती जमा केले जातात. याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांना मिळाल्यानंतर आगामी काळा लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मध्यंतरी महिलांना एकशे रुपये मार्च महिन्यानंतर दिले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु आता यावरती पूर्णविराम लागलेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि तथा अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयांच्या रकमेमध्ये आणखी वाढ केले जाणार असल्याचे संकेत दिलेले आहेत.
परंतु याबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे. सरकारने काही लाभार्थ्यांसाठी हा निधी कमी करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिला शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेमधून संपूर्ण रक्कम मिळणार नाही. जसे की, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पीएम किसान सन्मान योजना
राज्य सरकार आणि केंद्र सरकार पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचे आर्थिक मदत देते. यामुळे ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत. त्या महिलांना यापुढे लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना फक्त वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
त्यामुळे आता महिलांना दर महिना 1500 रुपये ऐवजी फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत. या बदलामुळे जवळपास सव्वा आठ लाख महिलांना या योजनेमधून कमी लाभ मिळणार आहे. अनेक महिला या निर्णयामुळे नाराज असल्याचं समोर आलेला आहे. परंतु शासनाकडे अपेक्षित निधी उपलब्ध नसल्याने अनेक योजना देखील चालवणे कठीण होत आहे त्यामुळे सरकारने हा नवीन प्रस्ताव सादर केलेला आहे.
काही सूत्रांच्या मते, सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास चौदाशे कोटी रुपयांचा कमी होणार आहे. ज्यामुळे सरकार अन्य योजनेमध्ये हा निधी खर्च करू शकतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकार असा निर्णय घेणार का याकडे पाण्यासारखे राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाकडे अनेक महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! ₹2100 सोड आता महिलांना ₹1500 मिळणे होणार बंद, काय आहे कारण?”