लाडकी बहीण योजनेत 19 लाख महीला अपात्र? तुमचे नाव चेक करा

Ladki Bahin Yojana Latest News : राज्यातील महिलांसाठी निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली, ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली. मात्र या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या फार मोठी असल्याने सरकारकडून या योजनेचे आता पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेत अनेक महिला अपात्र ठरणार आहेत तर कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत हे आपण जाणून घेऊया. Ladki Bahin Yojana Latest News

चार चाकी वाहन धारक महिलांची तपासणी सुरू ? (Checking of women driving four-wheelers begins?)

राज्य सरकारने पहिले टप्प्यामध्ये चार चक्की वाहन असलेल्या महिलांची तपासणी सुरू केलेली आहे. योजनेच्या निकषानुसार तपासणीमध्ये ज्या महिलांच्या नावावर ती चार चाकी वाहन असणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये 4:15 कोटी महिला मतदारांपैकी तब्बल अडीच कोटी महिला या योजनेच्या लाभ घेत मात्र त्यांचे कौटुंबिक वर्ष उत्पन्न खरोखरच अडीच लाखांपेक्षा कमी आहे का? हे शोधण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

पडताळणीमुळे लाखो महिलांचे लाभ रद्द होण्याची शक्यता.

या योजनेमध्ये काही महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा महिलांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच आत्तापर्यंत 65 वर्षे वरील लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना व नमो शक्ती योजनेतील महिला यांचा समावेश काढून टाकण्यात आलेला आहे. यामुळे पाच लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. पुढील टप्प्यात अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे.

  • एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेणाऱ्या असल्यास अपात्र.
  • बनावट कागदपत्रांद्वारे लाभ मिळवणाऱ्या महिला अपात्र.
  • निवृत्ती वेतन असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार नाही.
  • पाच एकरांपेक्षा अधिक शेत जमीन असलेल्या महिलांना या योजनेत लाभ दिला जाणार नाही.

या योजनेमुळे सरकार आर्थिक अडचणीत

सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे मोठी आर्थिक अडचण आली आहे. दर महिन्याला सरकारला 3,880 कोटी रुपये इतका निधी लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते कर्ज घ्यावे लागत आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये सरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी कठोर उपयोजना आखल्या जात आहेत.

महिला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभात कपात

राज्यातील 19 लाख महिलांना या योजनेमधून कपात करण्यात येणार आहे. या महिला केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे या महिलांना योजने मधून अपात्र करण्यात येणार आहे व त्यांना यापुढे फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

अपात्र लाभार्थ्याकडून पैसे परत घेण्यासाठी स्वतंत्र खाते

या योजनेतून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांकडून परतफेड करण्यासाठी स्वतंत्र लेखा शीर्षक तयार करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांनी पैसे परत करावे लागतील आणि ते जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालय किंवा तालुका बाल विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन जमा करता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!