Ladki Bahin Yojana Hapta : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. ती म्हणजे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठे भाष्य केलेले आहे. काय म्हणाले आहेत अजित पवार जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Ladki Bahin Yojana Hapta
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली. ही नुसती योजना नसून महिलांसाठी एक मोठी आर्थिक स्त्रोत बनलेली आहे. या योजनेमुळे महिलांनी महायुती सरकारला भरभरून यश मिळवून दिलेले आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झालेली आहे. सध्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करताना वित्तमंत्री अजित पवार यांनी हात अकडता घेतलेला आहे. महिलांना दिलेल्या आश्वासनुसार 2100 रुपये देण्याऐवजी 1500 रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे.
तसेच या योजनेबाबत विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यात पार्श्वभूमी वरती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार यांनी विधानसभेतून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे विधान केलेले आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार काय म्हणाले ?
राज्य सरकारने, महिला सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, अशातच ही योजना बंद होणार असल्याचे आरोप विरोधकाकडून केले जात आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केले आहे की, हि योजना बंद होणार नाही, परंतु यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना अधिक लाभ मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला सकारात्मक परिणाम दिसून येईल. अजित पवार यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपूरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यात आणखी सुधारणा करण्यात येतील.
ही योजना गरीब घटकातील महिलांसाठी आहे हे नेहमी सभागृहाच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, तर त्यातील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण दुरुस्ती करतो. आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना 100% लाभ मिळणार आहे.
आता यापुढे सरकार कोणते निर्णय घेते याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच या योजनेबाबत पुढील अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल व हा लेख तुमच्या मित्रांना व महिला लाभार्थ्यांना नक्की शेअर करा.