लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आली; फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा?

Ladki Bahin Yojana February installment: लाडकी बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे.आता लवकरच महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. अनेक दिवसांपासून राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. प्रसारमाध्यमांमधील वेगवेगळ्या तारखा प्रसारित होत असल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता.Ladki Bahin Yojana February installment

परंतु आता अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आजपासून महिलांच्या खात्यावरती थेट DBT अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्तेच्या वितरण करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून महिला व बाल विकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. यावेळेस महिलांना हा हप्ता मिळण्यास मोठा उशीर झाला असल्याचा सांगण्यात आले आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे हा हप्ता वितरणास विलंब झाला, असे सांगण्यात येत आहे.Ladki Bahin Yojana February installment

9 लाख महीला अपात्र !

राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यामुळे राज्यात अनेक महिला अपात्र ठरणार असल्याची बातमी सध्या समोर आलेली आहे. प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार राज्यात जवळपास नऊ लाख महिला पात्र ठरले आहेत. यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नऊ लाख महिलांना मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला मिळणार का नाही हे जाणून घेण्यासाठी लाभार्थी यादीमध्ये नाव तपासा.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

राज्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत. या महिला खरंच पात्र आहेत का याची तपासणी करण्यासाठी शासनाने आता कठोर निकष लागू केलेले आहेत. राज्यातील ज्या महिलांचे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी आहे व त्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही अशा महिलांना लाभार्थी मिळणार आहे. तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे व तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला या योजनेमधून वगळले जाणार आहे. जवळपास नऊ लाख महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहे.

सरसकट लाभ

लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली, या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली, निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा करण्यात आले. त्यापूर्वी कोणतीही निकषांची पडताळणी न करता सरकारने महिलांना सरसकट लाभ खात्यावरती जमा केला. परंतु आता सरकार आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहे यामुळे या योजनेचे निकषा ची अंमलबजावणी करून पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!