Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा महिलांना या योजनेतून लाभ मिळवत होता. परंतु आता या संदर्भात एक मोठी अपडेट हाती आलेली आहे. Ladki Bahin Yojana
राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने एक लोकप्रिय योजना राबवली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील महिलांमध्ये एक घर करू लागलेली आहे. आणि महिलांसाठी एक आर्थिक स्त्रोत बनलेले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत महिलांना एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. आता लवकरात महिलांना दहावा हप्ता देखील मिळणार आहे.
परंतु आम्ही तुम्हाला सांग इच्छितो की, या योजनेमुळे ज्याच्यात तिजोरी वरती मोठा आर्थिक भार पडला आहे. त्यातच इतर योजनेचा पैसा राज्य सरकारने लाडके बहिणीकडे वळत असल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत आहे. यामुळे सरकार मोठ्या आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले आहे. महिलांना ₹2100 रुपये कधी मिळणार ची अपेक्षा लागलेली आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज तज्ञांकडून लावण्यात येत होता. परंतु याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे कधी मिळणार अशी आशा महिलांमध्ये निर्माण झालेली आहे.
परंतु यावरती मंत्री संजय सावकारे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळाले आहे. जे हप्ते रखडले आहेत ते पुढच्या महिन्यांमध्ये महिलांच्या खात्यावरती येऊ शकतात. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या त्या महिलांना अधिक पैसे दिले गेलेले आहेत. सर्व गोष्टींचा आढावा घेऊन ज्या महिला राहिल्या आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल असे मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलेले आहे. एप्रिलचा हप्ता देखील लवकरात महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.