राज्यातील लाडकी बहीण योजनेतून 55 हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तपासा?

Ladki Bahin Yojana Beneficiary List : राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी सुरू असताना एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्यातील जवळपास 55 हजार महिला अपात्र ठरलेले आहेत चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Beneficiary List

लाडकी बहीण योजनेची यादी तपासात असताना मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाले आहेत. सुमारे, 55,334 महिलांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. यापुढे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही.

मराठवाड्यातील 21.97 लाख पात्र अर्जापैकी 55,334 अर्ज अपात्र ठरवले, तर 54598 अर्ज अद्याप ही प्रक्रियेत आहेत. त्यामुळे हजारो महिलांना यापुढे या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

पात्र लाभार्थ्यांसाठी दोन कागदपत्रे आवश्यक

लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी E-KYC आणि हयात दाखला अनिवार्य करण्यात आलेला आहे. दरवर्षी जून जुलै महिन्यात बँकेत E-KYC सादर करणे बंधनकारक असून, आहे हयातीचा दाखला न दिल्यास अनुदान रोखले जाईल.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांबाबत सरकारने स्पष्ट सांगितले?

जिल्हा निहाय अपात्र लाभार्थ्यांची संख्या:

  • छत्रपती संभाजीनगर – 6,655 महिला
  • धाराशिव – 2,533 महिला
  • लातूर – 8001 महिला
  • जालना – 9,622 महिला
  • हिंगोली – 5,825 महिला
  • परभणी – 2,802 महिला
  • बीड – 9,364 महिला
  • नांदेड – 10,532 महिला
  • एकूण – 55,334 महिला

राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू

या योजनेतून हजारो महिलांना पत्र ठरवल्याने राजकीय वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले, पण सरकार जाहिरातीसाठी मोठा खर्च करत आहे.

तसेच भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरून वाद निर्माण झालेला आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भाजपाचे सभासद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

महिलांनी वेळीच कागदपत्रे सादर करावीत

ज्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा पुढचा हप्ता हवा आहे अशा महिलांनी लवकरात लवकर हयातीचा दाखला आणि eKYC पूर्ण करावी अन्यथा त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही. कागदपत्र दाखल आपल्या बँकेत करावे.

अशाच नवनवीन ताज्या अपडेट साठी आजच आमचा पेजला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळतील व स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!