Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण तीन हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत. याबाबत स्पष्टीकरण देत असताना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाले की राज्यातील महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा महिला दिना दिवशी देण्यात येणार आहे आता महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा केलेली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हा निधी 7 मार्चपासून महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे, यामुळे महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु अनेक महिला या योजनेतून अपात्र होणार असल्याने त्यांच्याकडे देखील पाहण्यासारखे राहणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जवळपास दहा लाखाहून अधिक महिला अपात्र झालेले आहेत तर 50 लाख महिला पात्र होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे. Ladki Bahin Yojana
महिला आणि बालविकास मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
राज्याच्या मंत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती पोस्ट करत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी लवकरच जमा करण्या हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे.
हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती
राज्यामध्ये दोन कोटी 46 लाख महिला पात्र आहेत मात्र जानेवारी महिन्यात लाभार्थ्यांची संख्या पाच लाखाहून संख्या घटली होती पात्रतेची पडताळणी सुरू असल्याने जवळपास नऊ लाख महिलांच्या अर्ज पात्र ठरलेले आहेत त्यामुळे अनेक महिलांना या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
7 मार्च 2029 पर्यंत बँक खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहेत लाभार्थी महिलांची पात्रता तपासणी सुरू असून योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटलेली आहे. महिला लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे तपासणी शिफारस केली जाते. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधित अधिकृत अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल.