Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांना एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्हाला देखील या आधी दीड हजार रुपये मिळाले असेल तर ही बातमी नक्की वाचा कारण आता एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. यामध्ये राज्यातील अनेक लाखो महिलांचे हप्ते बंद झालेले आहे यामागचं कारण अद्याप समोर आलेला नाही परंतु राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरती काही महत्त्वाचे अपडेट दिलेली आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Ladki Bahin Yojana
महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाने जून 2025 साठी ची आकडेवारी जाहीर केली असून, यामध्ये प्रथमच पात्र व अपात्र लाभार्थ्यांची अधिकृत माहिती समोर आलेली आहे.
ज्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये सन्मान निधी मिळायचे, त्यापैकी लाखो महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही.
जून महिन्यात एकूण 2.25 कोटी पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती निधी वर्ग करण्यात आला. मात्र यावेळी 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे हे महिला वर्ग आता चिंता आणि संभ्रमात आहेत. आम्हाला या आधीचे हप्ते मिळालेले आहेत परंतु आत्ता जूनचा हप्ता जमा झाला नाही तर नेमकं काय कारण असेल आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत? प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
काही महिलांनी एकाहून अधिक योजनेचा लाभ घेतल्याचा उघड झालेला आहे. काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत. तर काही ठिकाणी पुरुषांनीच लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केल्याचा आढळून आलेला आहे हे असे अर्ज सध्या स्थगित करण्यात आलेले आहेत व त्यांची सखोल तपासणी करून जे अर्ज खरंच पात्र आहेत व अपात्र आहेत अशांची तपासणी होणार आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पष्ट केले आहे की, शासनाच्या इतर विभागाकडून माहिती घेऊन माहिती व तंत्रज्ञान विभागाने ही आकडेवारी सादर केली आहे. त्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे की, 26.34 लाख लाभार्थ्यांना अपात्र असताना लाभ घेतला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर शहानिशा सुरू करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज चुकीमुळे आढळे आहेत, पण ते पात्र आहेत त्यांचा ला पुन्हा सुरू करण्यात येईल अशी देखील शासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, काही लोकांनी खोटी कागदपत्र, चुकीची माहिती घेऊन योजनेचा गैरफायदा घेतला. यामुळे या बनावट लाभार्थ्यांवरती कायदेशीर कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
(अशाच अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला)
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर