Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचल्यानंतर लाडक्या बहिणींना नक्कीच आनंद होईल. लाडक्या बहिणी ज्या 1500 रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तोच जुलै महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जात आहे. याही वेळा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठ दिवसात कधीही पैसे खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे आपल्या बँक खात्यावर महिलांनी लक्ष ठेवावे.
हे पण वाचा| कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबर 2025 पर्यंत कापसाला काय दर मिळतील?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी आता पुढील म्हणजेच तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान सध्या या योजनेतील अर्जाची पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अपात्र अर्ज बाद केले जात असल्याने लाभार्थी महिलांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार?
10 लाख अर्ज अपात्र
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत सुमारे दहा लाख महिलांच्या अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत. जे अर्जदार योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. महिला व बाल विकास विभागाला आता नवीन यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून योग्य लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देणे सरकारचा हेतू आहे. खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळत रहावा. या पडताळणीमुळे भविष्यात योजनेचा लाभ अधिक योग्य महिलांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. पात्र महिलांनी चिंता न करता आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहावी. लवकरच तुम्हाला तुमच्या लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा आहे.
2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जुलै महिन्याचे ₹1500 खात्यात जमा होणार?”