Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेत असलेला लाखो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या ₹2100 रुपयांचा मुद्दा अखेर सरकार पातळीवर पुन्हा चर्चेत आला असून सत्तेतील मंत्री गिरीश महाजनांनी स्वतः पत्रिका परिषद घेत याबाबत उत्तर दिलं आहे. Ladki Bahin Yojana
मागील वर्षी जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या खात्यावरती दर महिना पंधराशे रुपये जमा होतात. आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती याची यशस्वीरित्या 11 ते नियमितपणे जमा करण्यात आले असून मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये जमा झाला आहे.
परंतु आता असा प्रश्न आहे की, महिलांना दिलेल्या आश्वासनानुसार ₹2100 रुपयांचा लाभ कधी मिळणार. तसेच महिलांना बारावा हप्ता कधी मिळणार त्याबाबत प्रशासनाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, हा आता पंधरा ते वीस जून दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात का, हे वाचून महिलांना नक्कीच आनंद वाटणार आहे.
परंतु त्यानंतर एकशे रुपये कधी मिळणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे, विधानसभाच्या काळामध्ये महायुती सरकारने वचन दिले होते की लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये दिले जातील. मात्र, सरकार स्थापन होऊन आता सहा सात महिने उलटले तरीही ₹2100 रुपये देण्याबाबत कोणताही ठोष निर्णय घेण्यात आलेला नाही.
अशा परिस्थितीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी याबाबत मोठी प्रक्रिया दिलेली आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन…
जळगाव मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन म्हणाले, “देश विकासाच्या मार्गावर जोमाने चाललाय. आम्ही लाडक्या बहिणींना दरमहा ₹1500 रुपये देतोय, जे आधी कुणीही दिले नव्हते. निवडणुकीच्या काळात ₹2100 रुपये देण्याचे वचन दिलं होतं, आणि सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करते”.
तसेच तसेच ते पुढे बोलत असताना आणखी म्हणाले “सरकार अजून स्थापन होऊन वर्षही झालं नाही. किंवा सहा सात महिने झालेत. आर्थिक अडचणी असूनही आम्ही नियमित पैसे देतोय. लाडक्या बहिणी आमच्यावर खुश आहेत, आणि भविष्यात 2100 रुपये देण्याचा निर्णयही सकारात्मक असेल. ”
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदा बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार ₹3,000? मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र