Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने यासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय जारी केला आहे. जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 2984 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणीच्या बँका त्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने जुलै 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि महिलांचा आर्थिक विकास करणे आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात. Ladki Bahin Yojana
पी एम किसान योजनेअंतर्गत जून महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना लागली आहे. जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला आहे. सरकारने या योजनेसाठी 28,290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी देण्यात आले आहेत. हा निधी वर्ग करण्याच्या मंजुरीमुळे जुलै महिन्याचा हप्ता पुढील दोन-तीन दिवसांमध्ये महिलांना मिळणे अपेक्षित आहे. या योजनेतून मिळालेल्या पैशातून राज्यातील करोडो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.
हे पण वाचा| सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
अपात्र महिलांवर कारवाई
या योजनेची अंमलबजावणी खूप घाई गडबडीमध्ये करण्यात आल्यामुळे यामध्ये काही त्रुटी आल्या होत्या. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या छाननीत असे आढळून आले की, 26.34 लाख महिला या योजनेत अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत होत्या. यावर सरकारने तात्काळ कारवाई करत जून महिन्यापासून अशा महिला अपात्र केल्या आहेत. जून महिन्यात दोन कोटी 25 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात आला होता. छाननी प्रक्रियेमध्ये अपात्र झालेल्या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ असा की, फक्त गरजू आणि पात्र लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
13 वा हप्ता तुमच्या खात्यात या तारखेला जमा होणार
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा म्हणजेच तेरावा हप्ता लवकरच मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागाला निधी मिळाला असल्यामुळे पुढील तीन-चार दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे रक्षाबंधन आधीच लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे थेट गिफ्ट मिळू शकते. ही योजना राज्यातील महिलांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याचे ₹1,500 लवकरच बँक खात्यात जमा होणार..”