Ladki Bahin Yojana : मागील सात महिन्यापासून महाराष्ट्रात फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. महायुती सरकारला परत सत्तेमध्ये बसवणारी एकमेव योजना ठरली आहे. लाडकी बहिण योजना संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती याबद्दलची माहिती दिली आहे.Ladki Bahin Yojana
लाडकी वहिनी योजनेतून तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरले आहे. जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरले आहेत अशा महिलांना प्रति महिना 1500 दिली जात आहे. ही रक्कम पात्र महिलांच्या महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केली जात आहे.
हे पण वाचा ;-लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये या महिला पात्र आहेत अशा महिलांना आतापर्यंत एकूण 7 हप्त्याचे 10,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे. परंतु आता या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी कुठे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे. जेणेकरून आता राज्य सरकार अशा महिलांवर कारवाई करणार आहे व या महिलांना अपात्र करणार आहे.
या महिला होणार अपात्र :-
महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये ते म्हणाले की दिनांक 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 रोजी निर्मित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत यापुढे या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही व या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे.
च्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत अशा 2,30,000 महिलांना या योजनेपासून वगळण्यात आले आहेत. तसेच या महिलांचे वय 65 वर्ष पेक्षा जास्त आहेत अशा महिला 1,10,000 आहेत या महिलांना सुद्धा या योजने पासून अपात्र करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरी चारच्या किंवा नाही व ज्या महिला नारीशक्ती योजनेचे लाभार्थी आहेत अशा महिलांनी यांचे अर्ज माघारी घेतली आहे अशा महिलांची संख्या 1,60,000 इतकी आहे.
हे पण वाचा ;-लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
म्हणजेच एकूण पाच लाख महिला या योजनेपासून अपात्र झाले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती, या योजनेमुळे शासकीय तिजोरीवर जास्त जोर येत होता. त्याचबरोबर अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर शिव भोजन थाळी आणि आनंदाचा या दोन्ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार :-
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू केली होती त्यावेळी महिलांना या योजनेअंतर्गत 1500 हजार रुपये दिले जात होते. परंतु निवडणुकीदरम्या न महायुती सरकारने लाडक्या बहिणींना असे आश्वासन दिली होती की आमची सत्ता परत आल्यानंतर आम्ही या योजनेत वाढ करून या योजनेचा हप्ता 1500 रूपया वरून 2100 रुपये करू.
परंतु अजून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, त्यामुळे अद्याप तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार :-
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना आतापर्यंत सात आपले प्राप्त झाले आहेत. व महिला आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे आतुरतेने वाट पाहत आहे. सूत्रांची माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ताह 20 फेब्रुवारी रोजी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. याची एकमेव कारण म्हणजे फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचाच आहे त्यामुळे या योजनेचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे.
14 thoughts on “मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र”