लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता कधी येणार? आली मोठी अपडेट समोर

Ladki Bahin February installment : महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय लाडकी बहीण योजनेबाबत सध्या महिलांमध्ये मोठी चर्चा रंगात आहे. ती म्हणजे महिलांची पुन्हा एकदा पडताळणी होणार. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin February installment

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. त्या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना जमा केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती सरकारने महिलांना या योजनेचे रक्कम वाढवून 2100 रुपये देऊन अशी घोषणा केली होती. त्यामुळे या आशाने लाखो महिला वाढीव रकमेकडे पाहत आहे.

या योजनेअंतर्गत फायदा मिळत असला तरी काही महिलांची अर्ज विविध कारणामुळे या योजनेमधून बाद करण्यात आलेले आहेत. आज माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत असलेल्या माहितीनुसार, पाच लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यांना यापुढे हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे अनेक महिलांची चिंता सध्या वाढत चाललेली आहे.

हे पण वाचा | मोठी बातमी ! लाडकी बहिण योजनेतून तब्बल 5 लाख महिला अपात्र

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

गेल्या काही महिन्यापासून या योजनेचा हप्ता महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावरती जमा केला जात. तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता देखील 25 तारखेला म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावरती जमा केलेला आहे. याच पद्धतीने फेब्रुवारी महिन्याचा पत्ता देखील 25 तारखेला महिलांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्याने, हा आता महिलांच्या खात्यावरती शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 तारखेच्या मागेपुढे जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत. राज्य सरकार कोणत्या वेळी या संदर्भात अधिकृत घोषणा करू शकते.

महिलांसाठी महत्त्वाची माहिती

  • महिला लाभार्थ्यांनी आपले बँकाचे अपडेट ठेवावे, कारण हप्ता थेट महिलांच्या बँकाच्या जमा होतो.
  • जर आपला वेळेवर जमा झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
  • जे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांनी अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन लाभार्थी यादी चेक करावी.

शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा

सध्याची परिस्थिती पाहता लाखो महीला या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु या योजनेमध्ये अनेक महिला अपात्र देखील ठरलेले आहेत. यापुढे वाढीव रक्कम 2100 कधीपासून मिळणार अधिकृत घोषणा सरकार कधी करेल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.

महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत

लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप खास ठरत आहे. त्यांना आर्थिक मदत व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. पुढील काळात या योजनेत आणखी सुधारणा करण्याचा शासनाचा मानस असल्याचा समजत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!