किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..

Kisan Credit Card Yojana: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली. पूर्वी या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना दिले जात होते. मात्र अर्थसंकल्पानंतर यामध्ये वाढ करून पाच लाख रुपये कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर आपण आज किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळवावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.

एक फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांची कर्ज परतफेड करण्याचा रेकॉर्ड चांगला आहे त्या शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. त्या पैशातून शेतकरी आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करू शकतात. ज्यामुळे शेतीतून उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती बळकट होईल.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार देशात 7.72 कोटी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. यापैकी ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत वाढीव रकमेचा लाभ मिळेल अशा शेतकऱ्यांची संख्या 80 लाखापेक्षा जास्त आहे. यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज काढले तर याचा बोजा 26 हजार कोटी रुपये होईल. यामुळे बँकांवर अतिरिक्त भर देखील पडणार नाही. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली असली तरी त्याचा लाभ फक्त या शेतकऱ्यांचे कर्ज परतफेडीचे रेकॉर्ड चांगले आहेत त्यांनाच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी ज्या प्रमाणात परतफेड करेल त्या प्रमाणात त्याची कर्जाची रक्कम वाढवली जाणार आहे. आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे 9.81 लाख कोटी रुपयाचे कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते. ज्यामुळे त्यांना शेती संबंधित खर्च करण्यास मदत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धारक शेतकरी असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या जमून जमिनीच्या व्हॅल्युएशन वर ठरवली जाते. या फायदा असा आहे की, कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज मिळते, या योजनेला अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सुलभ आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार वेळेवर पैसे मिळतात. Kisan Credit Card Yojana

हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

आवश्यक कागदपत्रे:

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • सातबारा, आठ अ
  • बँक पासबुक
  • शेतकऱ्यांची ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! योजनेमध्ये नवीन नियम लागू?

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?

किसान क्रेडिट कार्ड योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. किंवा काही बँका ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील देतात त्यामुळे तुम्ही घरबसल्या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. तुमच्या जवळील बँकेत जाऊन अर्ज घ्या आणि संपूर्ण अर्ज भरा. अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या जमिनीची माहिती तुम्हाला किती कर्ज हवं आहे याचा उल्लेख करा. त्याचबरोबर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा. भरलेला अर्ज बँकेत जमा करा आणि अर्ज मंजूर होण्याची प्रतीक्षा करा.

शेती संबंधित योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!