Kapus Bajarbhav | कापुस बाजार भावाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे आता कापसाचे भाव पुन्हा एकदा वाढत आहेत. परंतु हे दर वाढणे नेमकी कशासाठी बाजार व्यवस्था आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी? शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला आहे आणि आता दर वाढून काय उपयोग होणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांची सर्व अपेक्षाची माती झालेली आहे आणि कापसाचे दर आता वाढत आहेत नेमकं शेतकऱ्यांच्या हातात काय उरले? नेमका हा खेळ कोणता Kapus Bajarbhav
मध्यंतरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठ्या संकटाचा काळ कोसळला होता. धड उत्पादन चांगले होईना ना बाजारात भाव चांगला मिळाना. शेतकऱ्यांना कापूस पीक परवडत नसल्याचे बोलले जात होते. कापुस भाव मध्यंतरी कमी असल्याने शेतकऱ्यांनी कवडी मोल दरामध्ये कापूस त्यांचा विकून टाकला. शेतकऱ्यांना वाटत होते की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कापसाचे भाव वाढतील, परंतु शेतकऱ्यांनी भाव वाढेल अपेक्षा ने कापूस साठवून ठेवला होता. परंतु आता जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या भावामध्ये विक्री करून टाकलेला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच आता पाच दहा टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिलेला आहे. परंतु अचानक मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या दुखावरती मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु हंगाम संपत आला असला तरी कापसामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. शेवटी शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकल्यानंतर कापसामध्ये वाढ झालेली आहे. हंगामामध्ये शेतकऱ्यांना 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. परंतु आता 7400 ते 8000 रुपये असा दर मिळत आहे . व्यापारी आणि जिनिंग व्यवसायिक उच्च प्रतीच्या कापसाला जास्त दर देत आहेत.
मात्र सध्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याने हा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस विकून टाकलेला आहे. दरवाढीचे मुख्य कारण सरकीच्या दरात झालेली वाढ असल्याचा जाणकारांचे म्हणणे आहे. काही महिन्यापूर्वी सरकीचे दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले ते परंतु सध्या हे जर 3700 ते 4000 रुपये पर्यंत गेलेले आहेत. सरकीच्या भाव वाढीमुळे कापसाच्या किमती वरती थेट परिणाम झालेला आहे असा म्हणणं तज्ञांचा आहे.
खर तर शेतकऱ्यांचे परिस्थिती एकीकडे आड आणि एकीकडे वीहीर अशी झालेली आहे. ना कापूस पिकाला योग्य दर मिळतो ना अन्य इतर पिकाला योग्य दर मिळतो. सध्या शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेला असून कापसाचे दर वाढत असलेले शेतकऱ्यांच्या दुखावर्ती मीठ चोळले अशी परिस्थिती झालेली आहे. यावेळी संपूर्ण बाजार व्यवस्था व्यापाऱ्यांचा फायद्यासाठी असून शेतकऱ्यांचा शोषण करण्यासाठी अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. शासनाने यावरती नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमधून जोर धरू लागलेली आहे.