LIC ची भन्नाट योजना! या योजनेत एकदाच करा गुंतवणूक आणि मिळवा आयुष्यभर लाखो रुपयांची पेन्शन..

Jivan Shanti Yojana: आपल्यापैकी प्रत्येकाला त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करायची असते. मासिक पगारातून काही रक्कम बाजूला काढून ती चांगल्या ठिकाणी गुंतवली तर भविष्यात त्या पैशाची मोठी रक्कम तयार होऊन तुमच्याकडे चांगले. हे आपल्याला माहित आहे. याच विचारातून अनेक जण विविध योजनेमध्ये आपली रक्कम गुंतवणूक करतात. पण आज मी तुम्हाला एक अशाच योजनेबद्दल सांगणार आहे जे तुमच्या रिटायरमेंट नंतर भरघोस नफा मिळवून देईल. एलआयसी ची जीवन शांती योजना तुमच्या भविष्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते.

एकदाच गुंतवणूक करा आयुष्यभर पेन्शन मिळवा

आजच्या काळात जिथे प्रत्येक गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळणं कठीण झाला आहे. तिथे एलआयसीची ही योजना खरच खूप आकर्षक आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यात फक्त एकदाच गुंतवणूक करायचे आहे. तुम्ही या योजनेत एकदाच मोठी रक्कम गुंतवा आणि त्या गुंतवणुकीवर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर आणि निवडलेल्या पर्यावर अवलंबून असते.

गुंतवणूक कोण करू शकतात?

एलआयसीची ही योजना 30 ते 59 वयापर्यंत उपलब्ध आहे. यात कोणताही रिस्क कव्हर नसला तरी मिळणारे आर्थिक फायदे खूप मोठे आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यात दोन मुख्य पर्याय निवडू शकतात. डीफर्ड annuity for सिंगल लाईफ. डीफर्ड annuity for जॉईंट लाईफ. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. Jivan Shanti Yojana

हे पण वाचा| तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? नसेल केली तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल..

उदाहरणासहित गणित समजून घेऊया

समजा एका 55 वर्षाच्या व्यक्तीने एलआयसीच्या या योजनेत 11 लाख रुपये गुंतवले आणि ही रक्कम पाच वर्षासाठी गुंतवली तर तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

  • वार्षिक पेन्शन: 1,01,880 रुपये
  • सहामाही पेन्शन: 49,911 रुपये
  • मानसिक पेन्शन: 8149 रुपये

म्हणजे या योजनेत एकदाच 11 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपये पेक्षा जास्त पेन्शन मिळेल.

  • व्याजदर: एलआयसीच्या या योजनेचे व्याजदर वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याचा व्याजदर किती आहे तपासून घेणे गरजेचे आहे.
  • गुंतवणुकीची मर्यादा: तुम्ही किमान एक पॉईंट पाच लाख रुपयापासून या योजनेत गुंतवणुकीची सुरुवात करू शकतात. जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही त्यामुळे तुमच्या आर्थिक क्षमतेवर तुम्ही तुमची गुंतवणूक ठरवू शकता.
  • नोमिनीचा फायदा: जर दुर्दैवाने तुमचा मृत्यू झाला तर जमा केलेली रक्कम नोमिनीला दिली जाते त्यामुळे तुमच्या नंतरही तुमच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळतो.

एलआयसीची ही योजना निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तुम्हाला आर्थिक आधार देण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभराची पेन्शन मिळवायची ही सुवर्णसंधी तुम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करू शकतात.

अशाच नवनवीन माझ्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!