IPL 2025 Breaking News : देशातील सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमी वरती स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल 2025 आता पुन्हा सर्वांची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये धर्मशाळा येथे पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सामना ब्लॅक आउट करून रद्द करण्यात आला होता. मात्र आता भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (BCCI) या लिगच्या उर्वरित सामन्यांसाठी नवे वेळापत्रक आखण्याच्या हालचाली सुरू केलेले आहेत. IPL 2025 Breaking News
सर्व संघांना दोन दिवसात एकत्र येण्याचे आदेश!
Indian Express च्या माहितीनुसार, BCCI ने सर्व आयपीएल फ्राचायझिना येत्या मंगळवार पर्यंत एकत्र यावे असा आदेश दिलेला आहे. त्यानंतर उर्वरित सामने कुठे आणि कसे खेळायचे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. आयपीएल 2025 ला मी 30 पर्यंत वाढवण्याचा विचार सध्या सुरू असून, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद अशा ठिकाणी उर्वरित सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
11 मे रात्रीपर्यंत म्हणजे आज बीसीसीआय नव्या वेळ पत्रकाची घोषणा करू शकते, चा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. याआधी आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला होता. पण आता स्थगितीमुळे नवीन शेड्युलमध्ये अधिक डबल हेडर दोन दिवसात सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या 74 सामन्यांपैकी आतापर्यंत 58 सामने पार पडले आहेत. उर्वरित बारा लीग स्टेज सामने आणि चार प्ले ऑफ सामने खेळवायचे आहेत. प्ले ऑफ मधील क्वालिफायर एक आणि दोन एलिमिनेटर तसेच फायनल सामने हे पूर्वनियोजित ठिकाणीच ठेवले जाणार असल्याची माहिती BCCI ने स्पष्ट केलेले आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबल मध्ये गुजरात टायटन्स 16 पॉईंट्स आणि +0.793 नेट रणरेटसह पहिल्या स्थानावर आहे. दुसरा क्रमांकावर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ज्यांचा नेट रन रेट +0.482 असून तिसऱ्या क्रमांकावर पंजाब इंसाने चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या क्रमांकावर ते दिल्ली कॅपिटल्स आहे.
भारत-पाकिस्तान तनावाच्या पार्श्वभूमी वरती स्थगित झालेले आयपीएल 2025 ला नवसंजीवनी देण्यासाठी बीसीसीआय कडून लवकरच मोठी घोषणा होणार आहे. क्रिकेट प्रेमी, प्रेक्षक, खेळाडू आणि प्रसारमाध्यमांच लक्ष आता या नव्या वेळापत्रकाकडे लागून राहिला आहे.
हे पण वाचा | MI vs CSK | CSK ला दणका देणाऱ्या Vignesh Puthur ला मुंबई इंडियन्सने किती रुपयाला खरेदी केले? वाचा सविस्तर माहिती