IMD चा इशारा, राज्यातील या भागात पडणार पाऊस वाचा सविस्तर अंदाज

IMD Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती IMD Weather Update

सध्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी उन्हाचा तडाका वाढत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये साधारणपणे होळी नंतर तापमानात वाढ होत असते. परंतु फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहे. सध्या रत्नागिरी येथे 38.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. मात्र याचबरोबर भारतीय हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये रविवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार होण्याचा अंदाज असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

तसेच राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यामध्ये हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अल्पशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वाऱ्यांची दिशा निवृत्त कडून आग्नेय कडे राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये वायू व ईशान्येकडील वाऱ्याचे दिशा राहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात सध्या चक्राकार वारांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले आहे. यामुळे राज्यात पावसाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगाल ओडीसा या राज्यामध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच केरळ ते मध्य महाराष्ट्र पर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे. तसेच अशाच नवनवीन हवामान अपडेट साठी आजच आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

error: Content is protected !!