IMD Weather Update | ऑगस्ट महिना हा म्हणजे सणासुदीचा श्रावण महिना म्हणजे महादेवाचा पवित्र महिना. या महिन्यांमध्ये सणासुदीचे दिवस सुरू होतात. आता लवकरच रक्षाबंधन आणि त्यानंतर गौरी गणपती हे असे सन येतात आणि पुढे ही हे सन सुरूच राहतात आणि त्यासोबतच राज्यात पाऊस देखील पडत असतो. या बाबत हवामान खात्याने पुन्हा हवामान अंदाज वर्तवत पुढील काही दिवस चिंतेचे असल्याचे म्हटले आहे. कोकण आणि विदर्भ मध्ये पावसाचे वातावरण आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अजून देखील आकाशाकडे डोळे लावून शेतकरी बसलेले आहेत. आजच भारतीय हवामान खात्याने ( IMD) दिलेल्या माहितीनुसार थोडीशी चिंता वाढवणारे ठरणार आहे. IMD Weather Update
हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?
हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी पष्ट केले आहे की, मान्सूनचा दुसरा टप्पा म्हणजे ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. पण त्याच वेळी त्यांना एक मोठा धक्का देखील दिला तो म्हणजे मध्य भारत आणि पूर्वोत्तर भारतात पावसाची कमतरता राहण्याची शक्यता आहे.
यातच महाराष्ट्राचा बळीराजा अडकलेला असून, कारण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आधीच पावसाचा तुटवडा असल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे उरलेले श्रावण आणि पुढचे भाद्रपद जर कोरडे गेलं, तर शेतीचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जुलै अखेरपर्यंतची पावसाची आकडेवारी काय सांगते?
एक जून ते 31 जुलै पर्यंत देशभरात 474.3 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही सरासरी पेक्षा 6% जास्त आहे. 445.8 मिमी एवढा पाऊस सामान्य मानला जातो. पण हे सर्व देशाचे चित्र पाहता प्रत्यक्षात काही राज्यात अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिमाचलमध्ये तर कहर झाला. आणि काही राज्यांमध्ये पावसाचे नाव ही नाही. महाराष्ट्रात देखील हाच भास होत आहे कोकण विदर्भात मुसळधार पाऊस, पण मराठवाडा, सोलापूर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, आणि नगर सारखे जिल्हे अजूनही नजर लावून बसलेले आहेत.
पुढील दोन आठवडे पाऊस कमी होणार?
IMD चा आणखी एक मोठा अंदाज म्हणजे पुढील दोन दिवसात संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार आहे. म्हणजे ढग आहे पण पाणी नाही अशी स्थिती निर्माण होणार आहे. हेच दिवस खरंतर धान्य, तुर, मुग, उडीद यासारख्या खरीप पिकांसाठी निर्णायक असतात. जर या काळामध्ये पाऊस ओसरला, तर शेतकऱ्यांना दुसऱ्या पेरणीकडे बघावं लागणार. यामुळे खर्च वाढेल, उत्पन्न धोक्यात येईल आणि हाती येणाऱ्या पैशावर प्रश्नचिन्ह उभ राहील.
मराठवाड्यात मोठी चिंता…..
गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यामध्ये सतत पावसाच्या आणि दुष्काळाच्या काळाने होरपळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये जेमतेम 30-40% इतकीच पावसाची नोंद झाली. त्यात आता ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जर पावसाच प्रमाण कमी राहिल, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिक विमा, कर्जाची पुनर्रचना, मदतीची मागणी पुन्हा एरनिवर येणार हे स्पष्ट आहे.
(Disclaimer: वरील दिलेल माहिती हवामान विभागाच्या अंदाजानुसार व प्रसार माध्यमांच्या आधारे आहे. )
हे पण वाचा | राज्यातील या 18 जिल्ह्यांना अलर्ट जारी; या तारखेपासून महाराष्ट्रात होणार पावसाला सुरुवात
2 thoughts on “IMD Weather Update : राज्यावरती ऑगस्ट महिन्यात एक मोठे संकट; आयएमडीचा नवीन अंदाज”